‘टाईमपास’, ‘टकाटक’, ‘बालक पालक’, ‘डिलिव्हरी बॉय’ अशा चित्रपटांमधून अभिनेता प्रथमेश परब घराघरांत लोकप्रिय झाला. ‘टाईमपास’ चित्रपटामुळे आजही त्याला काही लोक ‘दगडू’ म्हणून ओळखतात. काही महिन्यांपूर्वीच प्रथमेशला त्याच्या खऱ्या आयुष्यातली ‘प्राजू’ भेटली. प्रथमेश आणि क्षितिजा यांचा लग्नसोहळा २४ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर अभिनेता लगेच त्याच्या कामामध्ये व्यग्र झाला.

आता प्रथमेश त्याच्या शूटिंगमधून वेळ काढून बायकोच्या माहेरी कोकणात गेला आहे. याच ठिकाणी या जोडप्याने त्यांची पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे. वटपौर्णिमाचा खास व्हिडीओ प्रथमेशची पत्नी क्षितिजाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रथमेश व क्षितिजा दोघेही जोडीने कोकणातील श्रीवर्धन येथे पोहोचले आहेत. याठिकाणी क्षितिजाचं गाव आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच गावी गेलेल्या जावयाचं घोसाळकरांनी जोरदार स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : दोन घटस्फोट अन् बिपाशा बासूशी तिसरं लग्न करण्याबाबत करण सिंग ग्रोव्हरने सोडलं मौन; म्हणाला, “जे झालं ते…”

“फक्त सात जन्मासाठी… प्रत्येक जन्मासाठी! तूच पाहिजेस प्रथमेश… वडाच्या झाडासारखं आपलं नातं दीर्घायुषी असावं. जन्मोजन्मी फक्त तुझीच साथ असावी… वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा… सौ. क्षितिजा प्रथमेश परब” असं सुंदर असं कॅप्शन लिहित क्षितिजाने वडाची पूजा करतानाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. दोघांनी आज सणाच्या निमित्ताने पारंपरिक लूक केला होता. प्रथमेश आणि क्षितिजाने आज खास ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाने सातव्या दिवशी कमावले फक्त ३ लाख, एकूण कलेक्शन किती? वाचा

प्रथमेश-क्षितिजाची लव्हस्टोरी

प्रथमेश परबचं लग्न अगदी सुंदर पद्धतीने पार पडलं होतं. प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख सोशल मीडियावर झाली होती. यानंतर दोघेही एका कॅफेमध्ये प्रत्यक्ष भेटले. दोघांमध्ये मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या जोडीने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : Video : खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी-झहीरची लग्नाआधी घेतली भेट, होणाऱ्या जावयाला सर्वांसमोर मिठी मारली अन्…

दरम्यान, प्रथमेश आणि क्षितिजा गेली ३ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. २०२४ च्या जानेवारी महिन्यात केळवणाचा फोटो शेअर करत त्यांनी लग्नाची तारीख जाहीर केली होती. यावेळी अभिनेत्याच्या सगळ्याच चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. यानंतर १४ फेब्रुवारीला साखरपुडा आणि त्यानंतर २४ फेब्रुवारीला प्रथमेश-क्षितिजाचं लग्न थाटामाटात पार पडलं. त्यांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते.