Prathamesh Parab wife Kshitija Ghosalkar Fitness Journey: प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा घोसाळकर सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करीत असते. त्यामध्ये दैनंदिन जीवनतील अनुभवांपासून ते काही मजेशीर गोष्टीही ती शेअर करते.

अनेकदा ती फिटनेसच्या संदर्भातील व्हिडीओ शेअर करते. डाएट, व्यायाम, तसेच तिच्या आहारात कोणत्या गोष्टी असतात, काय काळजी घेतली पाहिजे अशा अनेक गोष्टी ती शेअर करीत असते. आता क्षितिजाने फिटनेस प्रवासाबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

“९० दिवसांत…”

क्षितिजाने ऑगस्ट २०२६ आणि ऑक्टोबर २०२६ मधील असे काही जुने फोटो शेअर केले आहेत हे दोन्ही फोटो पाहिल्यानंतर तिच्यात झालेला फरक दिसत आहे. हे फोटो शेअर करीत तिने लिहिले, “माझंही असं ट्रान्स्फॉर्मेशन होऊ शकतं, याची मी कधीच कल्पना केली नव्हती.”

क्षितिजा घोसाळकर (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

पुढे तिने लिहिले, “मे महिन्यात सायन्स फिटनेस क्लब जॉईन केला. तेव्हापासून फिटनेसचा हा प्रवास सुरू झाला. पीसीओडीवर काम करणं आणि चरबी कमी करणं हे ध्येय होतं. ९० दिवसांत छान प्रगती झाली. ६० दिवसांपासून फॅट लॉसबरोबरच मसल गेन करण्यावरही लक्ष केंद्रित करीत आहे.”

क्षितिजा घोसाळकर (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

तिने असेही लिहिले की, खरं सांगायचं तर, मी असे कपडे निवडायचे, ज्यामध्ये पोट दिसणार नाही. पण, आता व्हिडीओसुद्धा शेअर करतेय, जो शेअर करण्याची कधी हिंमत झाली नव्हती. कारण, मला माझा प्रवास कुठून सुरू झाला, हे लपवायचं नाही. मी क्रॅश डाएट केलं नाही, जिमला गेले नाही; फक्त घरी व्यायाम केला, घरचं जेवण खाल्लं. संतुलित आहार घेतला. आता मला मासिक पाळीही नियमितपणे येते.

पुढे तिने पोस्टमध्ये ज्यांनी तिला या प्रवासात मदत केली त्यांचे आभार मानले आणि शेवटी लिहिले की, अजून खूप काही मिळवायचं आहे. पण, मी इतकी पुढे आले आहे, याचा मला अभिमान वाटतो. या प्रोसेसवर विश्वास ठेवायचाय आणि सातत्य राखायचंय.

क्षितिजा घोसाळकर (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

क्षितिजाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करीत तिचे कौतुक केले आहे. पती प्रथमेशनेही कमेंट करीत तिचा अभिमान असल्याचे सांगितले.