Prathamesh Parab Wife Kshitija Ghosalkar Reply To Fan : ‘टाइमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. ‘टाइमपास’नंतर प्रथमेशने ‘बालक पालक’, ‘उर्फी’, ‘३५ टक्के काठावर पास’, ‘टाईमपास ३’, ‘टकाटक’, ‘मुंबई लोकल’, ‘लालबागची राणी’ अशा काही चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोन वर्षांपूर्वी अभिनेता विवाहबंधनात अडकला.
प्रथमेशने गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रथमेश आणि क्षितिजा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स शेअर करत असतात.
प्रथमेशची पत्नी क्षितिजा कोटक एज्युकेशन फाऊंडेशनमध्ये काम करते. तसेच सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर म्हणूनही तिची वेगळी ओळख आहे. ती सोशल मीडियाद्वारे नेटकऱ्यांच्या संपर्कात राहत असते. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याबरोबरच क्षितिजा सामाजिक क्षेत्रातही काम करते. काही दिवसांपूर्वी तिने स्वत:च्या वाढदिवसानिमित्त Personality Studio by Kshitija म्हणून एका कोर्सची घोषणा केली होती. ज्यात तिने २६ दिवस, २६ वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना कौशल्ये शिकवले. याचे काही व्हिडीओ तिने आपल्या सोशल मिडिया पेजद्वारे शेअर केले आहेत.
अशातच क्षितिजाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या सेगमेंटमधून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी तिचे Personality Studio by Kshitija या नव्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यात तिला एका चाहत्याने अभिनेत्याची पत्नी असूनही हा संघर्ष करतेयस? असा प्रश्न विचारला होता. त्यावर क्षितिजानेसुद्धा त्या नेटकऱ्याला सकारात्मक उत्तर दिले होते.
“एका अभिनेत्याची पत्नी असूनही तू इतका संघर्ष करतेस. खरच तू आम्हा सर्वांना प्रेरणा देतेस. हे कौतुकास्पद आहे”, असं एका नेटकऱ्याने क्षितिजाला म्हटलं होतं. त्यावर क्षितिजा त्याला उत्तर देत म्हणाली होती, “खूप खूप धन्यवाद! पण मी याकडे संघर्ष म्हणून बघत नाही, हा एक प्रवास आहे जो मी मनापासून एन्जॉय करते. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करता, तेव्हा तो संघर्ष नसतो.”
प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा घोसाळकरने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी

“मला प्रथमेश परबची पत्नी असल्याचा अभिमान आहे आणि खरंतर तोच माझा प्रेरणास्थान आहेत. तो ज्या पद्धतीने काम करतो, त्याची कामाप्रती असलेली शिस्त आणि सातत्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे आणि अभिनेत्याची पत्नी असूनही तिने स्वतःचा वेगळा प्रवास करू नये, असं कुठेही लिहिलेलं नाही”, असंही ती म्हणाली होती. क्षितिजाने दिलेले हे उत्तर अनेक मुलींसाठी प्रेरणादायक आहे.
