Pravin Tarde : प्रवीण तरडे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅर्टन’ हे त्यांच्या हिट ठरलेल्या चित्रपटांपैकी आहेत. यातील ”मुळशी पॅटर्न’चा हिंदीत रिमेकही आला होता, ज्यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत होता. पण अनेकांना माहीत नसेल त्याचं दिग्दर्शन स्वत: प्रवीण तरडेच करणार होते. मात्र काही कारणांमुळे ते झालं नाही. आता त्यांनी स्वत: याबद्दल सांगितलं आहे.

प्रवीण तरडे सध्या त्यांच्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अवघ्या काही दिवसातच या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली. यानिमित्ताने त्यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्यांनी ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक असलेल्या ‘अंतिम’ या हिंदी चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी काही मतभेदांमुळे तो चित्रपट नाकारल्याचं सांगितलं आहे. दिग्दर्शक नेमकं काय म्हणाले याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

सलमान खानच्या चित्रपटाबद्दल प्रवीण तरडे काय म्हणाले?

प्रवीण तरडे यांना तुम्ही अजून हिंदीत काम केलेलं नीहीये ‘अंतिम’ होता होता राहिला, पण मराठी इंडस्ट्रीत अशी कोणती गोष्ट आहे जी हिंदीत नाहीये आणि तिकडे अशी कोणती गोष्ट आहे जी इकडे नाहीये असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, “मी अंतिम केला नाही कारण होती त्यामागे काही कारणं. पण, जर मी तो चित्रपट केला असता तर त्याचं नाव अंतिम नसतं. मुळशी पॅटर्नच असतं.”

प्रवीण तरडे पुढे म्हणाले, “मराठी इंडस्ट्रीत कौटुंबीक वातावरन आहे, आपलेपणा आहे जो इतर कुठेही नाहीये. महेश मांजरेकर जेव्हा दिग्दर्शन करत असतात तेव्हा मेधा मांजरेकर सगळ्यांसाठी जेवण घेऊय येतात. सचिन पिळगावकर यांच्या घरी गेलेला कोणाताही नवोदित कलाकार उपाशी तिथून परत जात नाही. त्याला ते जेवूनच पाठवतात. अशोक सराफ निवेदिता सराफ त्यांच्या घरी गेलेल्या कलाकाराला कधीच न जेवता पाठवत नाही.”

प्रवीण तरडे याबद्दल पुढे म्हणाले, “मी त्यांच्याबरोबर नाटक केलं होतं तेव्हाची गोष्ट आहे. निवेदिता यांनी मला जेवणासाठी विचारलं असताना मी नाही म्हटलं होतं. त्यावेळी अशोक सराफ तुझ्या चेहऱ्यावरुन कळतंय तू काही खालेलं नाहीय, खाऊन घे असं म्हणाले होते. चेहऱ्यावरुन जेवलोय की नाही हे ओळखलं होतं त्यांनी. असं वातावरन दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही.”