Happy Birthday Pravin Tarde : ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाचं नाव जरी घेतलं डोळ्यासमोर दिग्दर्शक प्रवीण तरडे येतात. मराठी कलाविश्वातील बहुआयामी दिग्दर्शक म्हणून त्यांना ओळखलं जातं. ‘रेगे’, ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’पासून सुरू झालेला प्रवीण तरडेंचा प्रवास आता ‘धर्मवीर २’ पर्यंत येऊन पोहोचला आहे. आज प्रवीण तरडे त्यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या पत्नीने खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रायोगिक नाटकांसाठी काम करत असताना प्रवीण तरडेंची ( Pravin Tarde ) स्नेहलशी ओळख झाली. काही दिवसांत दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी २००९ मध्ये लग्नगाठ बांधली. आज पतीच्या वाढदिवसानिमित्त स्नेहलने खास पोस्ट शेअर करत प्रवीण तरडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस

स्नेहल यांनी प्रवीण तरडेंबरोबरचा ( Pravin Tarde ) एका कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेते आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेऊन तिच्याशी गप्पा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. स्नेहल तरडे मिश्किल पोस्ट करत लिहितात, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…मी भाईचा बर्थडे गाणं नाही लावू शकत नाही.” तरडेंना दोस्तांचा दिग्दर्शक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे बहुतांश सगळेच जण प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त मुळशी पॅटर्नमधलं ‘भाईचा बर्थडे’ गाणं लावतात. पण, स्नेहल त्यांच्या पत्नी असल्याने हे गाणं लावू शकत नाहीत असं अभिनेत्रीला या पोस्टमधून सुचित करायचं आहे.

हेही वाचा : Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ

Happy Birthday Pravin Tarde
प्रवीण तरडेंच्या पत्नीची पोस्ट ( Happy Birthday Pravin Tarde )

हेही वाचा : मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”

दरम्यान, प्रवीण तरडेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर कथा, पटकथा, संवाद, लेखक, दिग्दर्शक… सिनेविश्वातील कोणतंच क्षेत्र त्यांना वर्ज राहिलेलं नाही. इतिहासातील सरसेनापती हंबीरराव असोत किंवा मुळशीतील नन्या भाई प्रत्येक भूमिका प्रवीण तरडेंनी पडद्यावर उत्तमरित्या साकारल्या आहेत. नुकतंच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘धर्मवीर २’ सिनेमाचं देखील सर्वत्र कौतुक करण्यात आलं.