अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांनीही अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. प्रवीण आणि स्नेहल दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. अलीकडेच स्नेहल यांनी नवऱ्याला दिलेल्या अधिकमासातील मानपानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अधिक मास हा जवळपास ३५ महिन्यांनी येतो. या अधिकमासात जावयाचे मानपान केले जाते. गेला महिनाभर अनेक सेलिब्रिटींनी अधिकमास साजरा केला आहे.
हेही वाचा : ‘गदर २’ देशात ब्लॉकबस्टर पण परदेशात ठरला फ्लॉप, बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे निराशाजनक
सध्या सर्वत्र अधिक मासाचा उत्साह आहे. महाराष्ट्रातील घराघरांत जावयाचे कौडकौतुक केले जात आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे अनेक मराठी कलाकारांनी अधिकमास साजरा केला. स्नेहल तरडे यांच्या आईने अधिकमासानिमित्त जावयासाठी खास तयारी केली होती. प्रवीण तरडेंच्या सासूबाई त्यांचे औक्षण करत असतानाचा व्हिडीओ स्नेहल यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच अभिनेत्याला सासरहून खास वाण सुद्धा देण्यात आलं आहे.
हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई पाहिल्यानंतर केदार शिंदे म्हणाले, “आता गर्दी…”
स्नेहल तरडेंनी शेअर केलेला व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओला त्यांनी “जावईबापू जिंदाबाद” हे मजेशीर गाणे बॅकग्राऊंडला लावले आहे. या व्हिडीओवर कमेंट करून चाहत्यांनी या जोडप्याचे भरभरून कौतुक केले आहे.
“जावईबापू खुश”, “वाह… जोरदार”, “तरडे साहेबांची मजा”, अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. स्नेहल तरडेंनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “अधिकाचे वाण…जावईबापू…अधिकमास” असे लिहिले आहे. प्रवीण तरडेंचे सासरी होत असलेले कौतुक पाहून त्यांचे चाहते भारावले आहेत.