Pravin Tarde & Snehal Tarde : मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते व दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडेंना ओळखलं जातं. त्यांच्या पत्नी स्नेहल देखील कलाविश्वात तेवढ्याच लोकप्रिय आहेत. महाविद्यालयात प्रायोगिक नाटकांसाठी काम करत असताना प्रवीण तरडेंची स्नेहल यांच्याशी ओळख झाली होती. यादरम्यान, दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी २००९ मध्ये लग्नगाठ बांधली. आज पत्नीच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडेंनी खास पोस्ट शेअर करत स्नेहल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

स्नेहल तरडेंनी आतापर्यंत ‘चौक’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’, ‘धर्मवीर २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल ठेवलं. यामध्ये प्राजक्ता माळी व गश्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनय, दिग्दर्शन एकंदर या इंडस्ट्रीत काम करताना अभिनेत्रीने आपलं घर, संसार या गोष्टी सुद्धा तेवढ्याच आपुलकीने सांभाळल्या. त्यामुळे आज स्नेहल यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडेंनी ( Pravin Tarde ) कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडेंनी ( Pravin Tarde ) मोजक्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “स्नेहल वाढदिवसाच्या शुभेच्छा… स्वत:चं घरदार आणि संसार सांभाळूनही करिअर किती सुंदर उभं राहू शकतं हे तू दाखवून दिलंस… अशीच समृध्दं होत राहा. तू माझा अभिमान आहेस.” असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आज वाढदिवसानिमित्त कलाविश्वातून सुद्धा स्नेहल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. प्रवीण तरडेंनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी देखील भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : ‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर

Pravin Tarde & Snehal Tarde
प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहल यांच्यासाठी खास पोस्ट ( Pravin Tarde & Snehal Tarde )

हेही वाचा : “चॅनेलने किरणला ४ वेळा वॉर्निंग दिली, मग काढलं” मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं? सविता मालपेकरांनी स्पष्टच सांगितलं…

याशिवाय अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर स्नेहल यांनी काही महिन्यांपूर्वीच ‘Study of Vedas’ हा अभ्याक्रम पूर्ण केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून अंतिम परीक्षेत ७८ टक्के गुण मिळवून त्यांनी यश संपादन केलं आहे. याची माहिती खास पोस्ट शेअर करून त्यांनी दिली होती.

Story img Loader