मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखलेंनी आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मोठ्या पडद्यापासून ते छोटा पडद्या गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणून शुभांगी गोखलेंना ओळखलं जातं. लवकरच त्यांची आता ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण त्यापूर्वी त्यांनी खास मैत्रीण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या घरी हजेरी लावली. या क्षणाचे फोटो सोनाली यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा – “सतत प्रवासात…” आदर्श शिंदेने उत्कर्षचा सांगितला खास गुण; फोटो पोस्ट करत म्हणाला…

शुभांगी गोखले या एकट्या सोनाली कुलकर्णी यांच्या घरी गेल्या नव्हता. तर त्यांच्याबरोबर लेक सखी आणि जावई सुव्रत जोशी सुद्धा होता. सोनाली यांनी या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शुभांगी गोखले, सखी, सुव्रत सोनाली कुलकर्णी यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे.

हेही वाचा – “मन इतकं भरून येतं”, चाहतीने दिलेली भेटवस्तू पाहून ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधती झाली भावुक; व्हिडीओ व्हायरल

सोनाली यांनी हे फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “असे जीवलग घरी यावे…त्यांनी आपल्यासाठी वेळ काढावा…अशा निवांत गप्पा रंगाव्या..या गोड दिवसातच आनंदानं रूतून बसलंय मन..खूप प्रेम आणि प्रेम…आम्ही तुम्हाला सोडणारच नव्हतो. #घट्टमैत्रिण #princess #जावई. ता.क…सुव्रत तुला ‘ताली’साठी खूप शुभेच्छा”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला ‘या’ अभिनेत्रीची येतेय आठवण; फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शुभांगी गोखले यांची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका ४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत शुभांगी यांनी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईची भूमिका साकारली आहे. तसेच या मालिकेत तेजश्रीबरोबर मुख्य भूमिकेत अभिनेता राज हंचनाळे पाहायला मिळणार आहे.