सध्या लग्नसराई सुरू आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसत आहेत. उद्या, २४ फेब्रुवारीला अभिनेता प्रथमेश परब बोहल्यावर चढणार आहे. त्यानंतर अभिनेत्री पूजा सावंत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या संगीताची जोरदार तयारी सुरू आहे. याचे फोटो समोर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री पूजा सावंतच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतंच पूजाच्या घरी खास व्याही भोजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी अभिनेत्रीने पारंपरिक लूक केला होता. जांभळ्या रंगाची साडी, सुंदर हार, मोकळे केस या लूकमध्ये पूजा दिसली. व्याही भोजनाच्या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने ओढी भरण्याचा देखील कार्यक्रम झाला. आता संगीताची तयारी सुरू झाली आहे. पूजाने इन्स्टाग्राम स्टोरीवर संगीताची तयारी करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तसेच अभिनेत्री सुखदा खांडकेकरने देखील डान्स प्रॅक्टिस दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा – प्रथमेश परबच्या होणाऱ्या बायकोने लग्नाच्या काही तासांपूर्वी शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “सासरी रमेपर्यंत…”

पूजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती स्वतः, बहीण रुचिरा सावंत तसेच कुटुंबातील इतर सदस्य डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. तसेच सुखदाने शेअर केलेल्या फोटोमध्ये गश्मीर महाजनीच्या बायकोसह भूषण कडू, वैभव तत्ववादी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: “संगीत, हळद अन् सातफेरे…”, रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी यांचं दोन पद्धतीत झालं लग्न, पाहा व्हिडीओ

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूजा विरुद्ध सिद्धेश असा क्रिकेटचा सामना खेळला गेला. यावेळी पूजाच्या टीममध्ये अनेक मराठी कलाकार पाहायला मिळाले. या सामन्यादरम्यान पूजाचा होणारा नवरा उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparations start for the sangeet ceremony began of pooja sawant pps
First published on: 23-02-2024 at 20:11 IST