Priya Bapat and Mukta Barve: मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ‘गणवेश’, ‘बंदीशाळा’, ‘हायवे’, ‘चकवा’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’चे तीनही भाग, ‘आघात’, ‘रणांगण’, ‘आम्ही दोघी’, ‘नाच गं घुमा’ अशा चित्रपटांतून मुक्ताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

मुक्ता बर्वे चित्रपटांबरोबर मालिका आणि नाटक या माध्यमांतूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करते. प्रिया बापटच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेत्री ‘आंधळी कोशिंबीर’, ‘पिंपळ’, ‘विस्फोट’, ‘टाइम प्लीज’, ‘हॅपी जर्नी’, ‘वजनदार’, ‘गच्ची’, ‘काकस्पर्श, ‘आम्ही दोघी’ अशा चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रिया बापट नाटक आणि वेब सीरिज या माध्यमांतही काम करते. ती विविध धाटणीच्या भूमिका साकारताना दिसते.

प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे या दोन्ही अभिनेत्रींनी `आम्ही दोघी’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. २०१८ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रतिमा जोशींनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. विशेष म्हणजे दोन लोकप्रिय अभिनेत्रींचा एकाच स्क्रीनवर अभिनय पाहणे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी होती.

आता ‘आम्ही दोघी’ या चित्रपटानंतर या दोन्ही अभिनेत्री पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. असंभव’ या चित्रपटातून प्रिया बापट आणि मु्क्ता बर्वे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी या चित्रपटातील कलाकार हजर होते. यामध्ये अभिनेता सचित पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

प्रिया बापटने सोशल मीडियावर मुक्ता बर्वेबरोबर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो मुक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आम्ही दोघी आणि असंभव चित्रपटाचा संदर्भ देत लिहिले, “आम्ही दोघी इन असंभव.” या फोटोमध्ये दोघीही खूप सुंदर दिसत आहेत.

`असंभव’ हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.