प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्याकडे मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून पाहिलं जातं. लग्नाआधी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये प्रिया-उमेशने लग्नगाठ बांधली. मराठमोळ्या पद्धतीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. उमेश-प्रियाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो, Reel व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या प्रिया-उमेशच्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट आहे फिटनेस संदर्भातली…

नव्या वर्षात सर्वत्र प्रिया-उमेशच्या फिटनेसची चर्चा होताना दिसतेय. हे दोघंही फिटनेस फ्रीक आहेत. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या फोटोंमध्ये दोघांचंही थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. उमेश-प्रियाने जिममध्ये हे खास फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्याचे सिक्स पॅक अॅब्स पाहायला मिळत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांसह मराठी कलाकार सुद्धा थक्क झाले आहेत.

प्रिया व उमेश दोघंही या फोटोंमध्ये एकत्र वर्कआऊट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणूनच प्रियाने या फोटोंना “Strength looks better together” असं कॅप्शन दिलं आहे. दोघांचा हा नवा, हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अभिनेत्रीने या फोटोंमध्ये प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर शैलेश परुळेकर यांना टॅग करत त्यांचे आभार मानले आहेत. तर, प्रिया-उमेशचं हे फोटोशूट तेजस नेरुरकर याने केलं आहे.

सिद्धार्थ बोडके, प्राप्ती रेडकर, जितेंद्र जोशी, श्रेया बुगडे, अभिज्ञा भावे, पूर्वा कौशिक, सखी गोखले या कलाकारांनी कमेंट्स करत प्रिया-उमेशच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

priya umesh
प्रिया बापट व उमेश कामत यांचं फोटोशूट ( फोटो सौजन्य : तेजस नेरुरकर )

“वॉव याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन”, “कडक आग ही आग”, “भाईसाब काय ट्रान्सफॉर्मेशन आहे मानलं राव”, “पॉवर कपल”, “बेस्ट कपल”, “माय फेव्हरेट कपल विषय एंड”, “याला म्हणायचं जाळ अन् धूर”, “हे खरे कपल गोल्स”, “आमची पॉवरफुल जोडी” अशा असंख्य कमेंट्स चाहत्यांसह मराठी कलाकारांनी प्रिया-उमेशच्या फोटोशूटवर केल्या आहेत.