Priya Bapat Birthday celebration inside video: प्रिया बापटचा आज (१८ सप्टेंबरला) वाढदिवस आहे. प्रिया तिच्या कुटुंबीयांबरोबर आणि जवळच्या लोकांबरोबर तिचा वाढदिवस साजरा करत आहे. उमेश कामतने सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर करत प्रिया बापट तिचा वाढदिवस कसा साजरा करत आहे, याची झलक दाखवली आहे.

प्रिया बापटने वाढदिवशी आईची नेसली साडी

उमेश कामतने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला तो म्हणाला, “नमस्कार, सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आज प्रियाचा वाढदिवस आहे तर प्रिया दिवसभर काय करतेय? तर मी तुम्हाला दाखवतो की प्रिया काय करत आहे.”

व्हिडीओमध्ये पुढे दिसते की प्रिया स्वयंपाकघरात असून ती काहीतरी बनवत आहे. उमेश तिला विचारतो की तू काय करत आहेस? वाढदिवस कसा साजरा करत आहेस? त्यावर ती म्हणाली, “मी नैवेद्य बनवत आहे. बाप्पाच्या आवडीचा आहे की नाही माहीत नाही, पण मला आवडतो.”

पुढे ती म्हणाली, “मी दुधी हलवा करत आहे, जो माझी आई माझ्या वाढदिवसाला करायची. याबरोबरच ताकातला पालक मला खूप आवडतो; तर तो कधीतरी बनतो, तो करणार आहे आणि बटाट्याची भाजी करणार आहे.” तसेच तिने हेही सांगितले की तिने तिच्या आईची साडी नेसली आहे. प्रियाने लाल रंगाची साडी नेसली असून तिने केसात गजरा माळला असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ सौजन्य: उमेश कामत इन्स्टाग्राम

उमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया भजी करत असल्याचे दिसत आहे. तसेच, सोबत सखी व सुव्रत असल्याचेदेखील ती सांगते. व्हिडीओमध्ये सखी व सुव्रत दिसतात. सखी जेवणाचं ताट दाखवत हसत म्हणते की आम्ही आयतं खायला आलोय. तसेच सुव्रत म्हणतो की, निगुतीनं स्वयंपाक केला आहे. प्रिया हेही सांगते की, सुव्रत पहिल्यांदा घरी आला आहे, तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने दादा-वहिनी, वडील आल्याचेदेखील प्रिया सांगते. सगळे प्रियाने केलेल्या स्वयंपाकाचे कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

व्हिडीओ सौजन्य: उमेश कामत इन्स्टाग्राम

दरम्यान, प्रिया तिच्या वाढदिवसाला आणखी काय करणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.