Happy Birthday Priya Bapat : मराठी नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखलं जातं. बालवयातच तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर ‘मुन्नाभाई MBBS’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीला दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पुढे, प्रियाने छोट्या पडद्यावर सक्रीयपणे काम करण्यास सुरुवात केली. कालांतराने ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये तिने काम केलं. नेहमीच विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारी प्रिया आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

मराठी कलाविश्वासह बॉलीवूडमधून आज प्रियावर ( Priya Bapat ) शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तिने वैयक्तिक आयुष्यात २०११ मध्ये उमेश कामतशी लग्न केलं. या दोघांची जोडी नेहमीच चर्चेत असते. प्रिया-उमेशकडे अलीकडची तरुणाई ‘कपल गोल्स’ म्हणून पाहते. यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आज बायकोच्या वाढदिवसानिमित्त उमेशने एक खास पोस्ट शेअर करत प्रियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : प्रिया बापट : चाळीत वाढलेली बबली गर्ल ते बहुपेडी अभिनेत्री

उमेश कामतची प्रियासाठी खास पोस्ट

उमेश कामत लिहितो, “प्रिया, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मला तुझ्यासारखं योग्य शब्दात व्यक्त होता येत नसलं, अचूक शब्दात कौतुक करता येत नसलं तरी, तुला माहीत आहे. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि मला तुझं किती कौतुक आहे. बाकी सगळं मला जे सांगायचंय ते मी हे Post करुन झाल्यावर Phone बाजूला ठेवला की, बाजूलाच बसलेल्या तुला प्रत्यक्ष सांगेनच”

हेही वाचा : “मेकअप का केलास, चेहरा धुऊन ये” प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “मुन्नाभाई MBBS चित्रपट करताना…”

उमेशने शेअर केलेल्या पोस्टवर श्रेया बुगडे, अमृता खानविलकर यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, सईने लाडक्या मैत्रिणीसाठी “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा प्रि…” असं कॅप्शन देत प्रिया ( Priya Bapat ) बापटबरोबर एक गोड फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : “चाळीतलं बालपण, शिवाजी पार्क ते बालमोहन शाळा…” प्रिया बापटचा थक्क करणारा प्रवास; म्हणाली, “दादर म्हणजे…”

दरम्यान, प्रियाच्या ( Priya Bapat ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकताच ‘विस्फोट’ हा तिचा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याशिवाय गेल्या वर्षभरापासून ती ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहे. यात प्रियाच्या जोडीला उमेश मुख्य भूमिकेत काम करत आहे. त्यामुळे प्रिया-उमेशच्या जोडीला चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.