Priya Bapat and Umesh Kamat Video: नाटक, सिनेमा व वेब सीरिजमध्ये दिसणारे कलाकार सोशल मीडियावरदेखील अनेकदा व्यक्त होतात. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल अधिक जाणून घेता येते.
अभिनेत्री प्रिया बापटदेखील सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा ती तिच्या नाटक, सिनेमा आणि वेब सीरिज यांच्याबद्दल काहीतरी शेअर करीत असते. काही वेळा ती स्वत:चेही फोटो शेअर करते. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा आहे. अनेक जण तिच्या पोस्टवर कमेंट्स करीत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात.
प्रिया बापट म्हणाली…
आता प्रियाने पती उमेश कामतच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने लिहिले, “माझ्या क्यूट नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” पुढे तिने लिहिले, बागेत शेक्सपिअरशी सहज गप्पा मारणारा आणि नवीन नाटकासाठी स्क्रिप्ट मागणारा एकमेव माणूस आहे. तुझा निखळ विनोद आणि हुशारी आपले आयुष्य सोपे बनवते. तू कधीच स्वत:ला बदलू नकोस.”
“तुला आगामी काळात खूप स्क्रिप्ट मिळोत, याच तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असे म्हणत प्रियाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तर तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये उमेश बागेतील पुतळ्याशी बोलत असल्याचे दिसत आहे. तो म्हणतो की, तुमच्याकडे काही नवीन नाटक आहे का? मी नाटक शोधतोय. काही लिहिलं आहे का? तुम्ही खूप लिहिलं आहे. पण, आजच्या काळातलं काही लिहिलेलं आहे का? तुम्ही लिहिलेलं आजच्या काळातही चालतंच; पण आम्हाला ते खूप कठीण जातं, जड जातं. शेवटी तो म्हणतो की, तुमचं पेन पडलं. त्यानंतर तो हसताना दिसत आहे.
आता प्रियाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी उमेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.
प्रिया आणि उमेश सध्या जर तरची गोष्ट या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. त्यांच्या या नाटकाचे नुकतेच ३०० प्रयोग पूर्ण झाले आहेत. त्यांच्या नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.
दरम्यान, प्रिया बापट नुकतीच असंभव या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिच्याबरोबर मुक्ता बर्वे आणि सचित पाटीलही प्रमुख भूमिकांत दिसले होते. आता आगामी काळात हे कलाकार कोणत्या भूमिकांत दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
