Priya Bapat and Umesh Kamat 15th Wedding Anniversary: प्रिया बापट व उमेश कामत हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपे आहे. प्रिया आणि उमेश नाटक, सिनेमा या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. याबरोबरच ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात.
“ही १५ वर्षं आपल्याला खूप काही…”
प्रिया व उमेश यांच्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने उमेशने प्रियासाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याने प्रियाबरोबरचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, “१५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
पुढे त्याने लिहिले, “ही १५ वर्षं आपल्याला खूप काही शिकवून गेली. आपण एकत्र वाढलो, शिकलो, कधी अडखळलो, खूप हसलो. जेव्हा जेव्हा वेळेने परीक्षा घेतली, त्यावेळी आपण एकमेकांची साथ सोडली नाही. आपण कायम नेहमी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो.”
शेवटी त्याने लिहिले, “यापुढेही आपण एकमेकांचे विश्वासू असू, मित्र, सहकारी, सहनिर्माते, प्रवास करणारे सोबती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पती-पत्नी म्हणून असू. १५ वर्षं झाली, पण आपण आजही एकमेकांनाच निवडतोय.”
उमेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पूर्वा कौशिकने गोड असे लिहित त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षर कोठारी, समीधा गुरू,सोनाली खरे, वैदेही परशुरामी, ऋजुता देशमुख, कादंबरी कदम अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक नेटकऱ्यांनीही हार्य इमोजी शेअर केल्या आहेत.
दरम्यान, प्रिया व उमेश सोशल मीडियावर विविध ठिकाणचे त्यांचे सुंदर फोटो शेअर करतात. तसेच, अनेकदा त्यांच्या दैनंदीन आयुष्यातील काही खास गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करतात. याबरोबरच, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातूनही ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येते.
