Priya Bapat & Umesh Kamat New Home : जवळपास दीड वर्षापूर्वी प्रिया बापट आणि उमेश कामत त्यांच्या नव्या घरात राहायला गेले. मात्र, या जोडप्याने त्यांच्या आलिशान घराची झलक नुकतीच चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यांचं हे घर १५०० चौरस फूटांचं असून, या आलिशान फ्लॅटमधील प्रत्येक जागा प्रिया-उमेशने खूप विचार करून सजवली आहे. त्यांच्या घरात ऑलिव्ह ग्रीन आणि ऑफ व्हाइट रंगाची थीम पाहायला मिळतेय.

नुकत्याच ELLE DECOR India ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया आणि उमेश यांनी त्यांच्या नव्या घराच्या इंटिरिअरबद्दल अनेक खुलासे केले आहेत. प्रियाला नव्या घरात डायनिंग टेबल नको होतं. त्यांच्या घरात प्रॉपर डायनिंग टेबल नसून किचनच्या जवळच उंच खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. या जोडप्याने संपूर्ण घराला पारंपरिक अन् मराठमोळा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रिया-उमेशच्या या नव्या घरात टाइल्स नाहीयेत, त्याऐवजी करड्या-पांढऱ्या, बेज-ऑफ व्हाइट रंगांचं मिश्रण करून फ्लोरिंग करण्यात आलं आहे.

‘या’ गोष्टी नव्या घरात हव्याच होत्या!

प्रिया बापट सांगते, “पहिली गोष्ट म्हणजे, आम्हाला आमच्या घरात ओपन किचन हवं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे, आम्हाला घरात डायनिंग टेबल नको होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला Walk-in Wardrobe हवाच होता. याशिवाय आम्हाला घरात टाइल्स नको हव्या होत्या…त्यामुळे आम्ही नॅचरल फ्लोरिंग करण्यास प्राधान्य दिलं.”

Priya Bapat New Home open kitchen
Priya Bapat & Umesh Kamat New Home : ओपन किचन, घरात डायनिंग टेबल नाहीये आणि लिव्हिंग रूममध्ये झोपाळा

“आमच्या गावी कोकणात झोपाळा आहे. त्यामुळे काहीही करून घरात झोपाळा मला हवाच होता.” असंही प्रियाने सांगितलं.

Priya Bapat New Home Walk-in Wardrobe
Priya Bapat New Home Walk-in Wardrobe

प्रिया-उमेशचं हे सुंदर घर चाहत्यांसह मराठी कलाकारांच्या सुद्धा पसंतीस उतरलं आहे. सुकन्या मोने, पल्लवी पाटील, कादंबरी नाईक, अमृता सुभाष, जितेंद्र जोशी, सारंग साठ्ये या सगळ्याच कलाकारांनी त्यांच्या या नव्या घराचं कौतुक केलं आहे. तर, प्रिया-उमेशचं हे घर सत्यजित पटवर्धन आणि पश्मीन शाह यांनी डिझाइन केलं आहे.