Priya Bapat & Umesh Kamat New Home First Look : प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्याकडे चाहते ‘कपल गोल्स’ म्हणून पाहतात. गेल्यावर्षी या जोडप्याने मुंबईत नवीन घर खरेदी केलं. यानंतर या जोडप्याने त्यांच्या नव्या घरात गणेशोत्सव ( २०२५ ) देखील साजरा केला होता. अभिनेत्रीच्या फोटोंमधून चाहत्यांना त्यांच्या नव्या घराची थोडीफार झलक पाहायला मिळाली होती. पण, आज पहिल्यांदाच प्रियाने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिच्या नव्या घराची संपूर्ण झलक चाहत्यांना दाखवली आहे.

प्रिया बापट-उमेश कामत यांचं हे नवीन घर पारंपरिक, मराठमोळं आणि अगदी सुंदररित्या सजवण्यात आलं आहे. याबाबत ELLE DECOR India ने सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं हे घर १५०० चौरस फूच असून, या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक डिझाइनमध्ये एक वेगळीच कथा दडलेली आहे. अशी कथा जी माणसाचं व्यक्तिमत्त्व, बालपणीच्या घरांशी असलेल्या भावनिक जवळीकतेची साक्ष देते. एकंदर हे घर जुन्या आठवणींना उजाळा देतं.

प्रिया बापट व उमेश कामत यांचं नवीन घर ( Priya-Umesh New Home )
प्रिया बापट व उमेश कामत यांचं नवीन घर ( Priya-Umesh New Home )

प्रिया-उमेशच्या नव्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये सागवानी लाकडाचा खांब आहे. मॉडर्न डिझाइनचा वापर करून संपूर्ण घराला या जोडप्याने पारंपरिक अन् मराठमोळा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या नव्या घरात करड्या-पांढऱ्या, बेज-ऑफ व्हाइट रंगाच्या सिमेंटच्या फरशा बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे लावल्या आहेत. हिरव्या, बेज आणि ऑफ व्हाइट रंगाच्या कॉम्बिनेशनमुळे संपूर्ण घर अगदी सुंदर दिसतंय.

प्रिया बापट व उमेश कामत यांचं नवीन घर ( Priya-Umesh New Home )
प्रिया बापट व उमेश कामत यांचं नवीन घर ( Priya-Umesh New Home )

किचनला जोडून ‘ब्रेकफास्ट काउंटर’ तयार करण्यात आला आहे. घरात डायनिंग नसून किचनच्या जवळच उंच खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. या घराचं मुख्य आकर्षण आहे लिव्हिंग रूममधील झोपाळा. या झोपाळ्याच्या अगदी बाजूला सागवानी खांब आहे. याशिवाय फोटोंमध्ये प्रियाने किचनमध्ये पारंपरिक लूक देणारी भांडी ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. या घराला छानशी बाल्कनी सुद्धा आहे. याठिकाणी प्रिया-उमेश खास फोटोशूट करतात.

प्रिया बापट व उमेश कामत यांचं नवीन घर ( Priya-Umesh New Home )
प्रिया बापट व उमेश कामत यांचं नवीन घर ( Priya-Umesh New Home )

प्रिया-उमेशच्या या सुंदर घरावर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. जितेंद्र जोशीने हे फोटो पाहून ‘प्रेम’ अशी कमेंट केली आहे.

प्रिया बापट व उमेश कामत यांचं नवीन घर ( Priya-Umesh New Home )
प्रिया बापट व उमेश कामत यांचं नवीन घर ( Priya-Umesh New Home )

तर, मुग्धा गोडबोलेने या फोटोंवर कमेंट करत ‘Beautiful’ म्हटलं आहे.

प्रिया बापट व उमेश कामत यांचं नवीन घर ( Priya-Umesh New Home )
प्रिया बापट व उमेश कामत यांचं नवीन घर ( Priya-Umesh New Home )
प्रिया बापट व उमेश कामत यांचं नवीन घर ( Priya-Umesh New Home )
प्रिया बापट व उमेश कामत यांचं नवीन घर ( Priya-Umesh New Home )

दरम्यान, नेटकऱ्यांना सुद्धा प्रिया-उमेशचं हे सुंदर घर खूपच आवडलं आहे. त्यांचं हे मराठी तसेच पारंपरिक लूक देणारं घर सर्वांच्या पसंतीस उतरलं असून, प्रत्येकजण एकच गोष्ट म्हणतोय ती म्हणजे घर असावं तर असं!