सुबोध भावे गेले काही दिवस ‘फुलराणी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमध्ये अभिनेत्री पाठमोरी उभी असलेली दिसली. त्यामुळे गेले अनेक दिवस फुलराणी कोण साकारणार अशी चर्चा रंगली होती. अखेर आज याचा उलगडा झाला आहे.

सुबोध भावे ची प्रमुख भूमिका असलेल्या ‘फुलराणी’ या चित्रपटासाठी टीझर आज प्रदर्शित झाला. या टीझरमधून फुलराणी कोण साकारणार हे आता प्रेक्षकांसमोर आलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकर आहे. ती या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.

Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल
Priyadarshini Indalkar
“त्या स्कीटनंतर इतकं हसं झालं”, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील किस्सा; म्हणाली…
Lakshmi Niwas Fame Meenakshi Rathod Daughter Yara sing Majha Bhimraya song
Video: ‘लक्ष्मी निवास’ नव्या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीच्या चिमुकल्या लेकीनं गायलं ‘माझा भिमराया’ गाणं, व्हिडीओ पाहून कराल कौतुक
sunny leone did pooja with children 1
सनी लिओनीने केली नव्या वास्तूची पूजा, मुलांसह म्हटले मंत्र; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ती त्यांना संस्कृती…”
shreyas talpade dubbing for allu arjun
Pushpa 2 : हिंदी डबसाठी पुन्हा एकदा मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा आवाज! अल्लू अर्जुनबद्दल म्हणाला, “आत्मविश्वास, स्वॅग अन्…”

आणखी वाचा : प्रसाद ओक व सई ताम्हणकरला हात जोडून मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?

या चित्रपटात सुबोध भावे विक्रम ही भूमिका साकारताना दिसणार आहे तर सुशांत शेलार सौरभ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटाच्या टीचरची सुरुवात एका ब्युटी कॉन्टेस्टपासून होते. तर यात सुबोध भावे रॅम्प वॉक करताना दिसत आहे. दरवर्षी माझ्या ग्रुमिंगमुळे या कॉन्टेस्टची विजेती त्याची मुलगीच होते असं तो म्हणतो. तर त्यावर त्याला सुशांत शेलार चॅलेंज करतो. मग काय एन्ट्री होते प्रियदर्शनी इंदलकरची. यात ती शेवंता तांडेल नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. सुबोध भावे तुला तू पुढच्या ब्युटी कॉन्टेस्ट ची विजेती असशील असा विश्वास दाखवतो. या टीझरमध्ये प्रियदर्शनीचा अल्लड पण गावरान अंदाज पहायला मिळतोय. त्याचबरोबर या टीझरमध्ये दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचीही झलक पहायला मिळत आहे

हेही वाचा : ‘कट्यार काळजात घुसली’ला ७ वर्ष पूर्ण होताच सुबोध भावेची मोठी घोषणा, पुन्हा प्रेक्षकांना देणार सांगीतिक मेजवानी

या टीझरला सोशल मीडिया वरून भरभरून प्रतिसाद मिळतोय. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी हा टीझर आवडल्याचं सांगत आहेत. चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच २२ मार्च रोजी प्रदर्शित होईल.

Story img Loader