Priyadarshini Indalkar and Abhijit Amkar Movie: प्रियदर्शिनी इंदलकर ही अभिनेत्री ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत पोहोचली. तिच्या अभिनयाचा चाहतावर्ग मोठा असल्याचे दिसते. तिच्या ‘रुखवत’, ‘दशावतार’ या मराठी चित्रपटांचे कौतुक झाले. तिच्या भूमिकांना विशेष पसंती मिळली.

आता अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता अभिजीत आमकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘लग्नाचा शॉट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

प्रियदर्शिनी इंदलकर ‘या’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

यामध्ये पाहायला मिळते की अभिजीत म्हणतो की लग्नाच्या बाबतीत काय फक्त मुलींचीच स्वप्नं असतात का? मुलांचीसुद्धा स्वप्नं असतात. होणाऱ्या बायकोबरोबर थोडा वेळ घालवावा. तिला जवळून ओळखावं.

टीझरमध्ये पुढे पाहायला मिळते की एक ट्रेन जात आहे. त्या ट्रेनच्या दरवाज्याजवळ अभिजीत आहे. ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रियदर्शिनी पळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिला पळताना पाहून अभिजीत तिला हात देतो. ते दोघेही नवरा-नवरीच्या वेशभूषेत दिसतात. प्रियदर्शिनी म्हणते की तुम्हा मुलांचा काही भरवसा नाही. मुलगी दिसली की तुमची लाळ टपकते.

प्रियदर्शिनी अभिजीतला विचारते, तुझं नाव काय रे? त्यावर तो म्हणतो, पळून आलेला नवरा. तो तिला तुझं नाव काय आहे, असं विचारतो. त्यावर प्रियदर्शिनी म्हणते, भाग के आयी हुई दुल्हनियां असे सांगते. पुढे ते इकडे तिकडे पळताना दिसतात. अभिजीत प्रियदर्शिनीला म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेव, देवाचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. प्रियदर्शिनी म्हणते की माझ्यावर विश्वास ठेव, देवाचा असला तरी माझा नाहीये. शेवटी लग्नाचा शॉट हे गाणं ऐकायला मिळत आहे.

चित्रपटात अभिजीत आणि प्रियदर्शिनीच्या पात्रांची नावे काय आहेत, गोष्ट नेमकी कुठे घेऊन जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच, आणखी कोणते कलाकार दिसणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, प्रियदर्शिनी इंदलकर महाराष्ट्राची हास्यजत्रामधून लोकप्रिय ठरली.तर अभिजीत आमकर सध्या तू ही रे माझा मितवा मध्ये प्रमुख भूमिकेत दिसत आहे.