Rahul Deshpande Visits Nana Patekar House For Ganpati Darshan: दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक कलाकारांच्या घरीदेखील श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. अभिनेते नाना पाटेकरांच्या घरी अनेक जण गणपतीच्या दर्शनासाठी जातात. तिथला अनुभव सांगतात. अनेकांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनी नाना पाटेकरांच्या घरी जात बाप्पाचे आशीर्वाद घेतले आहेत.
नानांच्या घरचा गणपती
राहुल देशपांडे यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते नाना पाटेकरांच्या घरी गेले असल्याचे दिसत आहे. नानांच्या घरच्या गणपतीची झलक या फोटोंमधून दिसत आहे. फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे, सुंदर सजावट केली आहे. केसरी व पिवळ्या रंगाची झेंडूची फुले तसेच इतर फुलांची आरास केली आहे. एका व्हिडीओमध्ये नाना स्वत: पांढऱ्या फुलांची नक्षी पूर्ण करत असल्याचे दिसत आहे. तसेच, फुलांनीच विनायक असे लिहिले आहे. श्री गणेशाच्या मूर्तीशेजारी मोठ्या समया दिसत आहेत.
राहुल देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते आणि नाना गणपतीपुढे बसले असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्यात गप्पाही सुरू असल्याचे दिसते. तसेच, माणसांची लगबगही दिसत आहे.
हे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना, “नानांच्या घरचा गणपती”, अशी कॅप्शन दिली आहे. तसेच, तू सुखकर्ता हे गाणेही ऐकायला मिळते.
राहुल देशपांडे यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “देवा, सरू दे माझे मी पण, द ग्रेट नाना आणि राहुल दादा”, आणखी एकाने लिहिले, “खूप सुंदर दादा”, एकाने लिहिले, “उत्तम क्षण”, आणखी एकाने लिहिले, “किती किती सुंदर आणि भावपूर्ण…मोरया”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.
दरम्यान, नाना पाटेकरांच्या घरातील गणपतीच्या दर्शनाला अनेक नामांकित व्यक्ती हजेरी लावतात, त्यामुळे नाना पाटेकरांच्या घरातील गणेशोत्सव कायम चर्चेत असतो.
