Raja Shivaji Box Office Collection: चित्रपटांची जेव्हा बॉक्स ऑफिसवर यशस्वीपणे घोडदौड सुरू असते, तेव्हा ते सिनेमे कोणते नवीन विक्रम करणार, कोणते जुने रेकॉर्ड तोडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते.
१ मे २०२६ ला ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने प्रदर्शित झाल्यापासून विविध रेकॉर्ड केले आहेत. प्रदर्शित झाल्यानंतरपहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा म्हणून राजा शिवाजीने विक्रम केला. लवकरच हा सिनेमा सैराटला मागे टाकत सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरणार आहे.
‘राजा शिवाजी’ सिनेमाने एकूण किती केली कमाई?
आता राजा शिवाजीने १७ व्या दिवशी एकूण किती कमाई केली आहे, तसेच १७ दिवसांत सिनेमाचे एकूण किती कलेक्शन झाले आहे, हे जाणून घेऊ…
‘राजा शिवाजी’ सिनेमाने पहिल्या आठवड्यात ५७.७ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने २७ कोटींची कमाई केली होती. रितेश देशमुख दिग्दर्शित या सिनेमाने १५ व्या दिवशी १.७ कोटींची कमाई केली होती, तर १६ व्या दिवशी २.९ कोटींची कमाई केली होती.
सॅल्कनिकनुसार, आता १७ व्या दिवशी म्हणजेच रविवारी सिनेमाने ३.०८ कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाची देशांतर्गत कमाई आता ९३.१ कोटी निव्वळ (१०९.९ कोटी एकूण) झाली आहे.
यासह सैराटनंतर १०० कोटींची कमाई करणारा दुसरा मराठी सिनेमा ठरला आहे. आता आगामी काळात ‘राजा शिवाजी’ सिनेमा आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर जगभरात ११४.८ कोटींची कमाई केली आहे.
आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० चित्रपट कोणते हे जाणून घेऊ…
१. सैराट-११० कोटी
२. राजा शिवाजी- ९३.१ निव्वळ( एकूण १०९.९ कोटी -१७ दिवसांत)
३. बाईपण भारी देवा- ७६.२८ कोटी
४. वेड- ६१.२ कोटी
५. नटसम्राट- ४१ कोटी
६. पावनखिंड- ३७.७२ कोटी
७. लई भारी- ३७ कोटी
८. कट्यार काळजात घुसली- ३५ कोटी
९. ठाकरे- ३१.६ कोटी
१०. टाइमपास-३० कोटी
दरम्यान, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले आहेत. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, विद्या बालन, संजय दत्त, जिनिलीया देशमुख, भाग्यश्री असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले आहेत.
