Raja Shivaji Box Office 10 Day Collection : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. १ मे रोजी हा ऐतिहासिक चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. ओपनिंग डेला सर्वाधिक १२.४० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. यानिमित्ताने सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून रितेश व ‘राजा शिवाजी’ टीमचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.४० कोटी, दुसऱ्या दिवशी ११.५० कोटी आणि तिसऱ्या दिवशी १३.१० कोटींचा गल्ला जमावला. यामुळे पहिल्याच वीकेंडला या सिनेमाचं एकूण कलेक्शन ३७ कोटींच्या पार पोहोचलं.
यानंतर दुसऱ्या वीकेंडला ( नववा व दहावा दिवस ) पुन्हा एकदा ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने आतापर्यंत म्हणजेच गेल्या दहा दिवसांत भारतात जवळपास ७३.३ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातील कलेक्शन ८० कोटींपर्यंत पोहोचल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.
‘राजा शिवाजी’ सिनेमाचं कलेक्शन
- पहिला दिवस – १२.४० कोटी
- दुसरा दिवस – ११.५० कोटी
- तिसरा दिवस – १३.१० कोटी
- चौथा दिवस – ६.२० कोटी
- पाचवा दिवस – ५.४० कोटी
- सहावा दिवस – ४.७० कोटी
- सातवा दिवस – ४.४० कोटी
- आठवा दिवस – ३.५० कोटी
- नववा दिवस ( दुसरा शनिवार ) – ६.३० कोटी
- दहावा दिवस ( दुसरा रविवार ) – ७.६० कोटी
- एकूण कलेक्शन – ७५.१० कोटी*
याशिवाय ‘राजा शिवाजी’ सिनेमाला ‘बुक माय शो’ आणि ‘IMDb’ वर सुद्धा खूप चांगलं रेटिंग मिळालं आहे. या सिनेमाचं ‘IMDb’ रेटिंग दहापैकी तब्बल ८.३ एवढं आहे. ही पोस्ट ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. रितेश देशमुखसह जिनिलीया देशमुख, भाग्यश्री, संजय दत्त, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, अभिषेक बच्चन, विद्या बालन, अमोल गुप्ते आणि सलमान खान या कलाकारांच्या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रितेशने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, जिनिलीया देशमुख आणि ज्योती देशपांडेंनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
