Raja Shivaji Box Office Collection Day 11 Updates & Records : ‘राजा शिवाजी’ सिनेमा १ मे रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. गेल्या दहा वर्षांपासून रितेश या सिनेमासाठी मेहनत घेत होता. मराठीसह बॉलीवूडचे दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

‘राजा शिवाजी’ सिनेमाने गेल्या दहा दिवसांत प्रेक्षकांची मनं जिंकून घेत बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं आहे. पहिल्याच दिवशी म्हणजे ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करणारा ‘राजा शिवाजी’ पहिला चित्रपट ठरला आहे. याचबरोबर या सिनेमाने ‘वेड’चा रेकॉर्ड देखील मोडला आहे. कारण, ‘वेड’ने बॉक्स ऑफिसवर ७३-७५ कोटींची कमाई केली होती. पण, ‘राजा शिवाजी’ सिनेमाने हा रेकॉर्ड दहाव्या दिवशी मोडला आहे. दहा दिवसांत या सिनेमाने ७५.१० कोटींची कमाई केल्याची अधिकृत पोस्ट रितेश-जिनिलीयाने शेअर केली आहे.

मात्र, सिनेमाच्या अकराव्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये घट पाहायला मिळाली. दुसऱ्या सोमवारी म्हणजेच ११ व्या दिवशी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने फक्त २.४० कोटी ( नेट कलेक्शन ) कमावल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन ( फक्त भारत )

  • पहिला आठवडा एकूण: ५७.७० कोटी
  • आठवा दिवस (शुक्रवार): ३.५० कोटी
  • नववा दिवस (शनिवार): ६.३० कोटी
  • दहावा दिवस (रविवार): ७.६० कोटी
  • अकरावा दिवस ( दुसरा सोमवार ) – २.४० कोटी
  • एकूण कलेक्शन – ७७.५ कोटी*

‘राजा शिवाजी’ सिनेमाने केले ‘हे’ रेकॉर्ड्स :

  • मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग डे
  • मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग वीकेंड
  • मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक एका दिवसाची कमाई
  • मराठी चित्रपटासाठी पहिल्या आठवड्यातील सर्वाधिक कमाई

याशिवाय ‘राजा शिवाजी’ सिनेमाला ‘बुक माय शो’ आणि ‘IMDb’ वर सुद्धा खूप चांगलं रेटिंग मिळालं आहे. या सिनेमाचं ‘IMDb’ रेटिंग दहापैकी तब्बल ८.३ एवढं आहे. ही पोस्ट ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे.

दरम्यान, आता ‘राजा शिवाजी’ सिनेमा १०० कोटी कमावलेल्या सिनेमांच्या यादीत एन्ट्री घेणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.