Raja Shivaji Movie Starcast : ‘राजा शिवाजी’ सिनेमामध्ये रितेश-जिनिलीयासह अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन अशा प्रसिद्ध कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्याच कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे. मात्र, यांच्यासह ‘राजा शिवाजी’ सिनेमात अनेक मराठी कलाकार देखील आहे. या सगळ्याच मराठमोळ्या कलाकारांनी सिनेमात लहानशा पण, लक्षात राहण्यासारख्या भूमिका साकारल्या आहेत.

‘राजा शिवाजी’ सिनेमात महेश मांजरेकर आणि जितेंद्र जोशी झळकणार असल्याचं आधीच स्पष्ट झालं होतं. पण, याव्यतिरिक्त सिनेमात मराठी मालिकाविश्वातील बरेच कलाकार झळकले आहेत. त्यांची नावं आता सिनेमा प्रदर्शित झाल्यावर समोर येऊ लागली आहेत.

‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकले ‘हे’ मराठी कलाकार

  • महेश मांजरेकर – लखुजीराव जाधव
  • ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील नंदिनी-काव्याची आई साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आभा वेलणकर – जिजाऊ माँसाहेबांच्या मातोश्रींची भूमिका
  • अमोल गुप्ते – मोहम्मद आदिलशहा
  • सचिन खेडेकर – शहाजीराजे भोसले
  • ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्री दिशा परदेशी – अफझल खानाच्या बेगमची भूमिका
  • ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेते सुहास शिरसाट – गावचा पाटील
  • कोरिओग्राफर रुपेश बने – शिवरायांची भूमिका
rupesh bane
रुपेश बने
  • जितेंद्र जोशी – पंताजी गोपीनाथ बोकिल
  • सुरेश विश्वकर्मा – चंद्रराव मोरे
sairat fame
सुरेश विश्वकर्मा – चंद्रराव मोरे
  • अशोक समर्थ – कान्होजी जेधे
  • मोहित टाकळकर – कृष्णाजी भास्कर ( अफझल खानाचे वकील )
  • अभिनेता शंतनू गंगणे
  • ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेता कपिल होनराव – येसाजी कंक
  • ‘स्टार प्रवाह’च्या मुरांबा मालिकेतील शिवा मुंढेकर ( रमा )

तसेच या ‘राजा शिवाजी’ सिनेमातून रितेश देशमुखच्या दोन्ही मुलांनी सुद्धा सिनेविश्वात एन्ट्री घेतली आहे. रियान व राहील देशमुख यांनी बाळ शिवरायांची भूमिका साकारली आहे. तसेच ‘छत्रपती’ या अँथम गाण्यात प्रेक्षकांना आर्य गोगावले आणि रितेशचे बंधू धिरज देशमुख यांचीही झलक पाहायला मिळाली आहे.

दरम्यान, राजा शिवाजीमधील ‘छत्रपती’ या अँथम गाण्याचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. ‘छत्रपती’ हे गीत सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलं असून, त्यांनीच ते आपल्या दमदार आवाजात सादर केलं आहे. अजय-अतुल यांना तब्बल ८० गायकांच्या समुहाने या गाण्याच्या निमित्ताने साथ दिली आहे. हे गाणं ऐकताच क्षणी अंगावर काटा येतो आणि प्रत्येकाच्या अंतर्मनाला हे गीत स्पर्शून जातं.