Industrialist Ratan Tata Died at 86 : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दानशूर, दिलदार, नफा-तोटा न पाहता देशप्रेमासाठी काम करणं अशी उद्योगपती रतन टाटा यांची ओळख होती. सामान्य जनतेपासून, राजकीय नेते ते कलाकार सगळेच त्यांच्या निधनानंतर हळहळले आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मराठी कलाकारांच्या भावुक पोस्ट

अभिनेता कुशल बद्रिके पोस्ट शेअर करत लिहितो, “एखाद्याला निरोप देताना आपण सहज ‘टा-टा’ म्हणतो, पण ‘रतन टाटा’ सर, तुम्हाला सहज निरोप देता येत नाहीये. तुम्ही देशाला नुसतं फोनने नाहीतर, माणुसकीने जोडलंत, माणसांमधल्या कॅन्सरच्या तारा कापून, इलेक्ट्रिकच्या तारांनी देश जगवलात. तुम्ही बनवलेल्या गाड्या जर भारतातल्या रस्त्यावरून धाऊ शकतात, तर त्यातून आम्ही चंद्रावर सुद्धा सहज प्रवास करू अशी मला खात्री वाटते. भारताला सुजलाम सुफलाम म्हणतात ते तुमच्या सारख्या महान व्यक्तींमुळेच. ‘रतन टाटा’ सर तसा आपला वैयक्तिक असा कधी संबंध आला नाही. लेकीन, मैने आपका नमक खाया है! आणि संबंधाचं म्हणाल तर ‘देवा’बरोबर ही माझा वैयक्तिक असा कधी संबंध आला नाही, पण त्याचे अनंत उपकार कधीच विसरता येणार नाहीत आणि तुमचे सुद्धा…- कुशल बद्रिके .”

vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
Ashok MaMa Colors Marathi New Serial
मुहूर्त ठरला! ‘अशोक मा.मा.’ मालिकेत झळकणार प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अन् ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय नायिका, पाहा प्रोमो

हेही वाचा : Ratan Tata: “माफ करा, माझा कुत्रा आजारी आहे”, रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्सकडून मिळणारा पुरस्कारही नाकारला होता!

लेखक क्षितीज पटवर्धन पोस्ट शेअर करत लिहितो, “रतन टाटा सर… ज्यांनी फक्त कंपनी नाही, तर संस्कृती उभी केली. फक्त मालाची विक्री नाही, मूल्यांची बांधणी केली. पिढ्यांना रोजगारच नाही, तर अगणित स्वप्न दिली. फक्त कंपनीला नाव नाही, तर देशाला कीर्ती दिली. तुमच्या वैचारिक श्रीमंतीला आणि भौतिक साधेपणाला, तेजःपुंज व्यक्तिमत्वाला, आणि लखलखीत कारकिर्दीला… विनम्र अभिवादन”

क्षितीजची हीच पोस्ट अभिनेता प्रसाद ओकने सुद्धा रिशेअर केली आहे. याशिवाय सलील कुलकर्णी, सुकन्या मोने, प्रसाद खांडेकर, संतोष जुवेकर याच्यासह संपूर्ण मराठी कलाविश्वात रतन टाटांच्या ( Ratan Tata ) निधनानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : Ratan Tata Death : “रतन टाटांच्या निधनाने देशाने मानवता आणि दातृत्वाचा मानबिंदू हरपला”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

 Ratan Tata
क्षितिज पटवर्धनची पोस्ट ( Ratan Tata )

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रतन टाटांची ( Ratan Tata ) प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातून त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज ( १० ऑक्टोबर ) दुपारी ३.३० वाजता वरळीतील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.