Ravi Jadhav shares photos of Ganpati idol: १४ सप्टेंबर २०२६ला गणेश चतुर्थी आहे. सर्वजण गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी करत आहेत. अगदी कलाकारही बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक आहेत. विविध सोशल मिडिया पोस्ट शेअर करत कलाकार त्यांच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करतात. आता लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रवी जाधव यांनी साकारली बाप्पाची मूर्ती

रवी जाधव हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. विविध पोस्ट, व्हिडीओ, फोटो शेअर करत ते त्यांच्या भावना व्यक्त करतात. त्यांनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी काही फोटो पोस्ट करत लिहिले, “२० वर्षं, माझा बाप्पा माझ्या हातून घडतोय आणि बाप्पाच्या हातून मी घडतोय”, असे म्हणत त्यांनी हार्ट इमोजी शेअर केल्या. म्हणजेच गेली २० वर्षे रवी जाधव स्वत: गणपतीची मूर्ती बनवतात.

रवी जाधव यांनी तीन फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो हा ब्लॅक आणि व्हाईट दिसत आहे. त्यांच्या समोर श्री गणेशाची छोटीशी मूर्ती दिसत आहे. तसेच, त्यांच्या हातात ब्रश दिसत आहे. दुसऱ्या व तिसऱ्या फोटोत गणपतीच्या मूर्तीचा रंग दिसत आहे. श्री गणेशाची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

आता रवी जाधव यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर सर. किती छोटू बाप्पा वाटतोय. बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर, जाधवांचा बाप्पा”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “गणपती बाप्पा मोरया.”

दरम्यान, गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. त्याचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेक कलाकारांच्या घरीही हा सण साजरा केला जातो. कलाकार त्यासाठी खास तयारी करतात, सजावट करतात. आता कलाकारांच्या घरातील गणपती पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.