केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे. “बहरला हा मधुमास” गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. या गाण्यावरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अमेरिकन सोशल मीडिया स्टार असलेल्या रिकी पाँडलाही या गाण्याची भुरळ पडली आहे. ‘डान्सिंग डॅड फ्रॉम युएसए’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँड यांनी “बहरला हा मधुमास” गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये गाण्याची हुक स्टेप करताना ते दिसत आहेत. रिकी पाँड यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

an old lady dance on 90s famous song
90’s च्या गाण्यावर आजीने केला भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
panjabi bride dance on marathi song
Video : पंजाबी नवरीने केला मराठी गाण्यावर डान्स; मराठमोळ्या लूकमध्ये केली मंडपात एन्ट्री, पाहा व्हिडीओ
Couple travelling in delhi metro dirty fight slap each other
VIDEO: “तुझ्यासारखा मुलगा कुणाला मिळू नये, माझ्या आयुष्यातून निघून जा” तरुणीनं बॉयफ्रेंडला चालू मेट्रोत कानफटवलं
Kareena Kapoor Khans wax figure a woman first reaction goes viral on social media
VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल
a delivery boy made jugaad
VIDEO : उन्हापासून वाचण्यासाठी डिलिव्हरी बॉयचा अनोखा जुगाड, व्हिडीओ होतोय व्हायरल
starter fish recipes in marathi
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल झणझणीत फिश फ्राय; स्टार्टर फिश फ्राय खाल तर खातच रहाल…
ola electric scooter driving in sea viral
“भाऊपण ओला, स्कूटरपण Ola…” या ‘नेक्स्ट लेव्हल टेस्टिंग’चा Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
why Horlicks remove healthy label
हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; हिंदुस्तान युनिलिव्हरला हा निर्णय का घ्यावा लागला?

हेही वाचा>> Video: मधुर भांडारकरांची निर्मिती अन् वैभव-ऋताची फ्रेश जोडी, ‘सर्किट’ चित्रपटाच्या टीमशी दिलखुलास गप्पा

हेही वाचा>> प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत, नौदलातील पतीने लिहिली चिठ्ठी, म्हणाला “तू सैनिकाची पत्नी…”

रिकी पाँड यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन “बहरला हा मधुमास” गाण्यावरील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी “हे नवं गाणं कसं वाटलं? मला वाटतं मी चांगलं केलं आहे,” असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. रिकी पाँड हे अमेरिकेतील प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आहेत. बॉलिवूड गाण्यावरही ते व्हिडीओ बनवतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात.

हेही वाचा>> पार्टीदरम्यान गर्लफ्रेंडचे हाय हिल्स उचलताना दिसला हृतिक रोशन, नेटकरी म्हणाले “बायकोची चप्पल…”

दरम्यान, बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील “बहरला हा मधुमास” हे गाणं प्रसिद्ध बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल यांनी गायलं आहे. तर कृती महेशने गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे