देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स इंडस्ट्रीज चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी लग्नबंधनात अडकणार आहे. राधिका मर्चेंट हिच्याशी अनंत अंबानी लग्न करणार आहे. लग्नाआधीचा (प्री-वेडिंग) कार्यक्रम गुजरातमधील जामनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. १ मार्च ते ३ मार्चपर्यंत प्री-वेडिंगचा हा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमासाठी परदेशासह देशातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. शिवाय या कार्यक्रमात हॉलीवूडपासून ते बॉलीवूडपर्यंतचे कलाकार परफॉर्म करणार असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या वर्षी १९ जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांचा साखरपुडा झाला होता. आता १२ जुलैला मुंबईत यांचा शाही लग्नसोहळा होणार आहे. पण त्यापूर्वी १ मार्चपासून तीन दिवसांसाठी प्री-वेडिंग कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. सध्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या दिग्दर्शकाची कामाप्रती निष्ठा, प्रेम पाहून तुम्ही कराल कौतुक, अपघात होऊनही…

अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात जगप्रसिद्ध रिहानापासून डेविड ब्लेन दमदार परफॉर्म करणार आहेत. तसेच अरिजित सिंह, दिलजीत दोसांझ यांच्यासह अजय-अतुल देखील परफॉर्म करणार आहेत.

हेही वाचा – लग्नानंतरचा पहिलाच डोंबिवलीतील ‘स्वरपोर्णिमा’ कार्यक्रम झाला हाऊसफुल्ल, मुग्धा वैशंपायन म्हणाली, “प्रत्येक कलाकारासाठी…”

याशिवाय, अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला दिग्गज कलाकार मंडळी हजेरी लावणार आहेत. अमिताभ बच्चन, रजनीकांत, अक्षय कुमार, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, सैफ अली खान, माधुरी दीक्षित, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल, कतरिना कैफ असे अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमात संगीत, डान्स, कार्निव्हल मस्ती, व्हिज्युअल आर्ट आणि एक खास सरप्राइज परफॉर्मन्स होणार आहे.