नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी रिंकू राजगुरु आता आघाडीची अभिनेत्री झाली आहे. नवनवीन चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिकेत रिंकू दिसत आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २' या चित्रपटातील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटात तिने साकारलेली तानिया प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. अशी ही प्रेक्षकांची मनं जिंकणारी रिंकू नुकतीच बॉलीवूड सुपरस्टारच्या कुटुंबाला भेटली. याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट, व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये बॉलीवूडचा सुपरस्टार गोविंदाच्या कुटुंबियांबरोबर ती दिसत आहे. हेही वाचा - Video: ‘जाऊ बाई गावात’ची विजेती रमशा फारुकी झळकली होती ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत, पाहा व्हिडीओ रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा, मुलगा यशवर्धन, मुलगी टीना दिसत आहे. गोविंदाच्या पत्नी रिंकूला घट्ट मिठी मारून फोटो काढताना पाहायला मिलत आहे. हा फोटो शेअर करत रिंकूने लिहिलं आहे, "बऱ्याच दिवसांनी भेटले." हेही वाचा - ‘या’ चिमुकलीला ओळखा पाहू? आहे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दरम्यान, रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘सैराट’ या चित्रपटानंतर ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. इतकं नाहीतर तिने ओटीटीच्या दुनियेतही पदार्पण केलं. ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्ये ती झळकली. यामध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताबरोबर काम केलं आहे.