‘सैराट’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतो. चित्रपटाचे कथानक आणि गाणी यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. याबरोबरच या चित्रपटातील कलाकारांचीदेखील मोठी चर्चा झाली होती. आर्ची या पात्रातून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) होय. आता रिंकू राजगुरूने एका मुलाखतीदरम्यान तिची दिवसाची सुरुवात कशी असते, यावर वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतीच ‘व्हायफळ’ या यूट्यूब पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान, रिंकूने ती दिवसाची सुरुवात कशी करते, दिवसभर ती काय करते याबद्दल वक्तव्य केले आहे. तिने सांगितले, “मी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान झोपत असल्याने मी सकाळी लवकर उठते. साडेपाच, सहा किंवा सात यादरम्यान मला जाग येते. त्यानंतर गरम पाणी आणि लिंबूचे सेवन करते.

मला माझ्या घराची साफसफाई करायला आवडते, त्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर घर झाडून घेते. घर स्वच्छ असलं की छान वाटतं. मग चहा पिते. त्यानंतर वर्कआऊट करते. पुस्तक वाचणे, चित्रपट बघणे किंवा बाहेर मीटिंगला जाणे याबरोबरच स्वयंपाक बनवून जेवण करणे यात माझा संपूर्ण दिवस जातो”, असे रिंकूने या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

‘या’ गोष्टीशिवाय रिंकूचा दिवस अपूर्ण

‘व्हायफळ’ पॉडकास्टमध्ये बोलताना रिंकूने सांगितले की, तिला चहा खूप आवडतो. ती कधीही चहाचे सेवन करू शकते. सकाळी उठल्यानंतर मला मी केलेला चहा हवाच असतो, तर माझ्या दिवसाची चांगली सुरुवात होते. आईमुळे चहा पिण्याची सवय लागली, असेही तिने म्हटले आहे. चहा, मी आणि आई हे समीकरण ठरलेले आहे. आता ही सवय अंगवळणी पडलेली आहे. मी कितीही ठरवलं तरीही चहा पिण्याची सवय जात नाही. उलट मी जर आता चहा प्यायले नाही तर मला चुकल्यासारखं वाटतं.

रिंकूला कसा चहा आवडतो?

रिंकूने ती चहा बनवताना काय सामग्री वापरते, हेदेखील सांगितले आहे. ती म्हणते की, वेलची, तुळस, आलं घातलेला चहा आवडतो. याबरोबरच साखर घालून केलेल्या चहापेक्षा गुळाचा चहा खूप आवडतो, असंही तिने म्हटले आहे.

रिंकू राजगुरुच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतीच ती ‘झिम्मा २’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.