काही कलाकार हे फार कमी वयात प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करतात, आपला मोठा चाहतावर्ग निर्माण करतात. अशा कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. सोशल मीडियावरदेखील नवनवीन लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असल्याने रिंकू सतत चर्चेत असते. आता मात्र अभिनेत्री रिंकू राजगुरू ही मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

रिंकू राजगुरूने नुकतीच ‘व्हायफळ’ या यूट्यूब पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केले आहे. बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिचे अकलुजचे घर, शाळा यावरदेखील ती बोलली आहे. याबरोबरच आईबद्दलदेखील तिने भाष्य केले आहे.

काय म्हणाली रिंकू राजगुरू?

सुट्ट्यांमध्ये ती कुठे जाते? या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू म्हणाली, “मी आजोळी कधी गेले नाही, कारण आई खूप लहान असतानाच पहिल्यांदा तिचे वडील वारले, मग आई वारली. तिची गोष्टच वेगळी आहे. मग ती लग्न करून इकडे आली आणि मग लग्नानंतरच तिने शिक्षण घेतलं. आईला स्वत:च्या पायावर उभं राहायचं होतं. ती म्हणाली, मला स्वत:चं असं काहीतरी पाहिजे. बाबा म्हणाले, शिक्षण घे. मग तिने डी.एड. केलं आणि आज तीदेखील शिक्षिका आहे.”

पुढे ती म्हणते, “आम्हाला रक्ताची नाती कमी आहेत. आईचा माहेरशी सध्या काही संबंध नाही. त्यामुळे कधी आजोळी जाणं झालं नाही. मला आठवतंय, सुट्ट्यांमध्ये मी एकदा की दोनदा आत्याकडे गेले होते. पण, तिचं घर छोटं होतं आणि तिथेच तिचं किराणा मालाचं दुकान होतं आणि आम्ही लहान होतो, त्यामुळे तिला सगळं सांभाळणं व्हायचं नाही; अशी आठवण रिंकूने या पॉडकास्टमध्ये सांगितली आहे.

हेही वाचा: दिवंगत राजेश खन्नांना दिलेली ‘बिग बॉस’ची ऑफर, निर्माते एका एपिसोडसाठी देणार होते तब्बल ३.५ कोटी, पण…

याबरोबरच रिंकूने तिला चहाची सवय तिच्या आईमुळे लागली असून ती सवय मी कितीही ठरवलं तरी आता जात नाही आणि चहाशिवाय माझा दिवस अपूर्ण राहतो. आई, मी आणि चहा हे समीकरण ठरलेलं आहे, असे म्हटले आहे.

लहान असताना शाळेतून घरी जाताना ती श्वान व मांजराची पिल्लं घेऊन घरी जायची आणि लपवून ठेवायची, अशी आठवणदेखील तिने सांगितली आहे.

दरम्यान, रिंकू राजगुरूने ‘सैराट’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने निभावलेल्या आर्चीच्या भूमिकेला चाहत्यांकडून मोठे प्रेम मिळाले होते. अभिनेत्री नुकतीच ‘झिम्मा २’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku rajguru shared emotional story of her mother in new interview nsp
Show comments