Rinku Rajguru visits ZP marathi school: रिंकू राजगुरू काही दिवसांपूर्वी ‘पुन्हा साडे माडे तीन’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्याआधी तिने ‘आशा’, ‘बेटर हापची लव्ह स्टोरी’, ‘झिम्मा २’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘झुंड’, ‘अनकहीं कहानियाँ’, ‘मेकअप’, ‘कागर’, ‘सैराट’ अशा अनेक सिनेमांत प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केला. रिंकूचा पहिलाच सिनेमा सैराट हा प्रचंड गाजला होता. रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर हजारो लोक तिला फॉलो करतात.
रिंकू अभिनयातून तर प्रेक्षकांचे मनोरंजन तर करतेच, पण त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर ती विविध व्हिडीओ शेअर करते. विविध लूकमधील फोटो शेअर करते. जेव्हा ती वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देते, तेथील फोटोदेखील ती शेअर करते. तिच्या या फोटो, व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करताना दिसतात.
रिंकू राजगुरूने शेअर केला व्हिडीओ
आता रिंकूने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकूने मराठी शाळेला भेट दिल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये रिंकू शाळेतील मुलांबरोबर गप्पा मारत असल्याचे दिसत आहे. तसेच ती खाऊ देत असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे. मुलेही निरागसपणे तिच्या बोलताना, गप्पा मारताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी रिंकूचे काही फोटोदेखील पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना रिंकूने लिहिले, “या जिल्हा परिषद शाळेकडे जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत. शाळेच्या परिसरात खूप सुविधा नाहीत. तरीही ही निरागस मुलं मोठी स्वप्नं आणि चेहऱ्यावर हसू घेऊन दररोज शाळेत येतात.त्यांनी मला शिकवलं की कितीही अचडणी असल्या तरी आशा, कृतज्ञता आणि सतत शिकत राहण्याची जिद्दीपासूनच खरे शिक्षण सुरू होते.” पुढे तिने असेही लिहिले, “आज त्यांच्याकडून जिद्द, समाधान आणि आनंदाने जगण्याचा खरा धडा मिळाला.”
रिंकूच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “लहानपणीच्या दिवसाची खूप छान आठवण आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “खूप छान”, आणखी एकाने लिहिले, “छान”, तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.
दरम्यान, आगामी काळात रिंकू कोणत्या कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
