scorecardresearch

रितेश देशमुखच्या ‘वेड’मुळे मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावली, ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहांमध्ये चित्रपट कायम, आतापर्यंतची कमाई किती?

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ची तुफान कमाई, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

Ved Marathi Movie riteish deshmukh
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ची तुफान कमाई, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. ‘वेड’नंतर शाहरुख खानच्या ‘पठाण’सह इतर चित्रपटही प्रदर्शित झाले. पण याचा रितेश-जिनिलीयाच्या चित्रपटावर कोणताच परिणाम झाला नाही. आता चित्रपट प्रदर्शित होऊन ५० दिवस उलटले आहेत. तरीही चित्रपटगृहांमध्ये ‘वेड’ पाहण्यासाठी प्रेक्षक जात आहेत. यादरम्यानचाच एक व्हिडीओ रितेश-जिनिलीयाने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : …अन् अचानक वनिता खरातच्या घरी पोहोचला ओंकार भोजने, अभिनेत्रीला मिठी मारताना पाहून तिच्या नवऱ्याने काय केलं? पाहा व्हिडीओ

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण त्याचबरोबरीने रितेश व जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहण्यासाठीही प्रेक्षक विसरले नाहीत. ‘सैराट’ चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला. ५० दिवसांनंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कितपत कमाई केली हे आता समोर आलं आहे.

प्रदर्शनाच्या ५० दिवसांमध्ये या चित्रपटाने जगभरात ७४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मराठीमध्ये सर्वाधिक चालणाऱ्या चित्रपटांमध्ये आता ‘वेड’चाही समावेश झाला आहे. मध्यंतरी व्हॅलेंटाईन डेनिमित्त रितेशने प्रेक्षकांसाठी खास ऑफर ठेवली होती.

आणखी वाचा – “आता त्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही” ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद मिळाल्यानंतर कोणावर भडकला एमसी स्टॅन?

‘वेड’ कोणत्याही चित्रपटगृहामध्ये फक्त ९९ रुपयांमध्ये दाखवण्यात आला. १४ ते १६ फेब्रुवारी ही ऑफर होती. याचाच या चित्रपटाला सर्वाधिक फायदा झाला. आता ‘वेड’च्या यशानंतर हे मराठमोळं कपल आणखी कोणता नवा मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-02-2023 at 11:41 IST

संबंधित बातम्या