scorecardresearch

रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची जादू कायम; ९ व्या दिवशी चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

आत्तापर्यंत या चित्रपटाची ही सर्वात मोठी कमाई आहे

रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची जादू कायम; ९ व्या दिवशी चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
फोटो : सोशल मीडिया

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटून गेला आहे. तरीही हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर तूफान प्रेक्षक गर्दी करत आहेत. जिनिलीयाने या चित्रपटातून मराठीमध्ये पदार्पण केलं तर रितेशचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच मराठी चित्रपट आहे. या सेलिब्रिटी कपलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

आठवड्याभरामध्ये या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. रणवीर सिंगच्या ‘सर्कस’लासुद्धा या चित्रपटाने आठवड्याभरात मागे टाकलं आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपये कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ३ कोटी २५ लाख रुपये गल्ला जमावला. रविवारी ४ कोटी ५० लाख तर सोमवारी ३ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले.

आणखी वाचा : अखेर रणबीर आणि अलियाने फोटोग्राफर्सना दाखवला मुलीचा चेहरा, पण…

चित्रपटाची ९ व्या दिवसाची कमाई पाहून तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. पहिल्या दिवसाच्या तब्बल दुप्पट कमाई या चित्रपटाने ९ व्या दिवशी केली आहे. रिमेक असूनही हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. ट्रेड रीपोर्ट आणि एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार ‘वेड’ या चित्रपटाने ९ व्या दिवशी तब्बल ५ कोटीचा गल्ला केला आहे.

आत्तापर्यंत या चित्रपटाची ही सर्वात मोठी कमाई आहे, आणि असाच प्रतिसाद मिळत राहिला तर हे आकडे येणाऱ्या काळात आणखी वाढतील अशी अपेक्षा आहे. आठवड्याभरात या चित्रपटाने तब्बल २० कोटीची कमाई केली आहे जे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप अभिमानास्पद आहे. ‘वेड’ चित्रपटाच्या तुलनेत इतर बॉलिवूड चित्रपटांची जादू मात्र फिकी पडली. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 09:31 IST

संबंधित बातम्या