scorecardresearch

सिगारेट व दारू पिण्याबाबत रितेश देशमुखने केलं होतं भाष्य, म्हणाला, “जिनिलीया व मी…”

रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख यांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, या सेलिब्रिटी कपलच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेऊया.

rireish deshmukh genelia deshmukh wedding anniversary
रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख यांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण, या सेलिब्रिटी कपलच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेऊया.

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्याकडे चित्रपटसृष्टीमधील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांमधील खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री कमालीची आहे. आज या बहुचर्चित कपलच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त दोघंही सध्या त्यांचा खासगी वेळ एण्जॉय करत आहेत. रितेश व जिनिलीया त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ट्रेकिंगला गेले आहेत.

आणखी वाचा – देशमुखांची सून झाल्यानंतर पिठलं-भाकरी आवडीने खाते जिनिलीया, पण स्वतः जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही कारण…

रितेश व जिनिलीया अगदी सुखाचा संसार करत आहेत. ‘वेड’ चित्रपटानिमित्त ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये या दोघांनीही हजेरी लावली होती. यावेळी रितेशने त्याच्या खासगी आयुष्याबाबतही भाष्य केलं. शिवाय दारू व सिगारेटच्या व्यसनाबाबतही त्याने आपलं मत मांडलं.

रियान आणि राहील नावाची दोन मुलं आहेत. या मुलाखतीदरम्यान चित्रपट करत असताना त्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याचा तुम्ही विचार करता का? असा प्रश्न रितेशला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावेळी रितेश खासगी आयुष्याबाबत बोलताना म्हणाला, “या चित्रपटामधील माझा लूक पाहून माझ्या मुलांनी मला विचारलं की तुमच्या तोंडामध्ये काय आहे. सिगारेट म्हणजे काय? असंही विचारलं.”

आणखी वाचा – “घाणेरडं कंबरे खालचं लिहायचं आणि…” कोणावर भडकले शरद पोंक्षे? शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

“आम्ही लोकांच्या तोंडामध्ये हे पाहिलं आहे अशी माझी मुलं मला म्हणाली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आपण हे काही करत नाही. शिवाय आम्ही दोघंही सिगरेट व दारू पीत नाही.” एखाद्या गोष्टीबाबत रितेश व जिनिलीयाला त्यांच्या मुलांनी प्रश्न विचारताच ते त्याचं खरं उत्तर त्यांना देतात. शिवाय रितेश व जिनिलीया दोघंही निर्व्यसनी असल्याचं यामधून स्पष्ट झालं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 15:36 IST