Video : रितेश देशमुख व जिनिलीयाच्या सुखी संसाराची ११ वर्षे; अजूनही दोघं दिवसभर भांडतात कारण... | riteish deshmukh genelia deshmukh 11th wedding anniversary actress share funny video on instagram see details | Loksatta

Video : रितेश देशमुख व जिनिलीयाच्या सुखी संसाराची ११ वर्षे; अजूनही दोघं दिवसभर भांडतात कारण…

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्या लग्नाला अकरा वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

rireish deshmukh genelia deshmukh
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्या लग्नाला अकरा वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्याकडे चित्रपटसृष्टीमधील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांमधील खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री कमालीची आहे. आज या बहुचर्चित कपलच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त दोघंही सध्या त्यांचा खासगी वेळ एण्जॉय करत आहेत. रितेश व जिनिलीया त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ट्रेकिंगला गेले आहेत.

आणखी वाचा – देशमुखांची सून झाल्यानंतर पिठलं-भाकरी आवडीने खाते जिनिलीया, पण स्वतः जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही कारण…

दरम्यान लग्नाच्या अकराव्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने एक खास रिल व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलीया व रितेशचा मजेशीर अंदाज पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणेच त्यांच्या या रिल व्हिडीओला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

“तुझ्यासाठी मी संपूर्ण जगाबरोबर भांडू शकते.” असं जिनिलीया या व्हिडीओमध्ये बोलत आहे. यावर रितेश म्हणतो, “संपूर्ण दिवस तर तू माझ्याबरोबरच भांडण करत असते.” त्यानंतर जिनिलीया म्हणते, “मग तूच तर माझं जग आहेस”. जिनिलीयाचं हे उत्तर ऐकून रितेश चेहऱ्यावरचे हावभाव बदलतो.

आणखी वाचा – Video : …अन् नाशिकच्या हॉटेलमध्ये जाताच चुलीवर भाकऱ्या करु लागली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, सोशल मीडियावर होतंय कौतुक

त्यांच्या य मजेशीर व्हिडीओला तासाभरातच एक लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर “लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक रिल तर झालंच पाहिजे” असं जिनिलीयाने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. तसेच चाहते रितेश व जिनिलीयाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 17:10 IST
Next Story
Video : काळ आला होता पण…! रितेश देशमुखच्या ‘वेड’च्या संवाद लेखकाचा भीषण अपघात, म्हणाला, “नाशिक-मुंबई हायवेला कुणी वाली आहे का?”