scorecardresearch

‘पठाण’ची चर्चा असतानाही ‘वेड’ चित्रपटाने जगभरात किती कोटी रुपये कमावले? रितेश देशमुखनेच सांगितली खरी आकडेवारी, म्हणाला…

‘वेड’ चित्रपटाने जगभरात किती कोटी रुपये कमावले? रितेश देशमुखने पोस्ट शेअर करत दिली माहिती

Ved Marathi Movie riteish deshmukh
‘वेड’ चित्रपटाने जगभरात किती कोटी रुपये कमावले? रितेश देशमुखने पोस्ट शेअर करत दिली माहिती

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखचा ‘वेड’ चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. पण अजूनही या चित्रपटाची क्रेझ काही संपलेली नाही. ‘वेड’ चित्रपटाला शाहरुख खानच्या ‘वेड’ चित्रपटाचा फटका बसणार असं बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. रितेशने ‘वेड’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – ‘तू चाल पुढं’मध्ये काम करणाऱ्या अंकुश चौधरीच्या बायकोचं शिक्षण किती? स्वतःच खुलासा करत म्हणाली…

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळत आहे. पाच दिवसांमध्येच या चित्रपटाने ५०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान या चित्रपटाच्या काही आठवडे आधीच रितेशचा मराठी ‘वेड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये येत आहेत.

‘पठाण’चाच सगळीकडे बोलबाला असताना रितेशने ‘वेड’च्या बॉक्सऑफिस कलेक्शनबाबत दिलेली माहिती थक्क करणारी आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ७० कोटी ९० लाख रुपये इतपत कमाई केली आहे. तर देशभरात ५८ कोटी ११ लाख रुपये कमावले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन ३१ दिवस उलटल्यानंतरची ही आकडेवारी आहे.

आणखी वाचा – विलेपार्लेच्या चाळीत राहते ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “आई दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवायचं करायची काम अन्…”

“अतिशय आनंदी, आभारी, ऋणी” असं रितेशने ही पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे. रितेशने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार ‘पठाण’चा या चित्रपटावर कोणताच परिणाम झाला नसल्याचं दिसून येत आहे. आता ‘वेड’ चित्रपट १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 17:20 IST