scorecardresearch

Video : …अन् त्याक्षणी ढसाढसा रडली होती जिनिलीया देशमुख, लग्नाचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल, रडताना दिसली अभिनेत्री

rireish deshmukh genelia deshmukh
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल, रडताना दिसली अभिनेत्री

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांच्याकडे चित्रपटसृष्टीमधील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांमधील खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री कमालीची आहे. ३ फेब्रुवारीला रितेश व जिनिलीयाच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त दोघंही ट्रेकला गेले होते. आता जिनिलीयाने तिच्या लग्नामधील खास क्षणांचा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये ती भावूक झालेली पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – वनिता खरातने ‘या’ रिसॉर्टमध्ये केलं लग्न, खर्च केले हजारो रुपये, जेवणाचीच किंमत आहे तब्बल…

रितेश व जिनिलीया ही जोडी खऱ्या आयुष्यातही अगदी सुपरहिट आहे. ऑनस्क्रीन या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण खऱ्या आयुष्यातही या दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम पाहिलं की अगदी हेवा वाटतो. जिनिलीयाने तिच्या लग्नातील काही खास क्षण शेअर केले आहेत.

रितेश व जिनिलीयाच्या लग्नाचे फोटो रोनिका कंधारी हिने काढले होते. रोनिकानेच या दोघांच्या लग्नाच्या फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ जिनिलीयाने रिपोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलीया मराठमोळ्या लूकमध्ये अगदी सुंदर दिसत आहे. तर रितेशचा नवरदेवाच्या पेहरावात एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – वीणा जगतापला अजूनही विसरु शकला नाही शिव ठाकरे, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “तिला…”

या व्हिडीओच्या शेवटी जिनिलीया रडताना दिसत आहे. हा भावूक क्षण घरच्यांना निरोप देत असताना असावा असं बोललं जात आहे. जिनिलीयाने हा सुंदर व्हिडीओ पाहून फोटोग्राफर रोनिकाचे आभार मानले आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी अधिकाधिक पसंती दर्शवली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 14:20 IST
ताज्या बातम्या