रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रितेशने या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. तर जिनिलीयाने ‘वेड’ मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

रितेश व जिनिलीयाने ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली. या मुलाखतीत त्यांनी दिलखुलासपणे सगळ्याच प्रश्नांना उत्तरे दिली. रितेशने हिंदी चित्रपटातू त्याच्या मनोरंजन क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. त्याने अनेक हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘लय भारी’ चित्रपटातून रितेशने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण त्याचा मराठी चित्रपट पाहण्याआधीच त्याचे वडील व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं निधन झालं होतं.

marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

हेही वाचा>>“धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर…”, तुनिषाच्या आईचे शिझान खान व कुटुंबियांवर गंभीर आरोप

हिंदी चित्रपटात स्क्रीनवर रितेशचं नाव रितेश देशमुख असं असतं. पण मराठी चित्रपटात अभिनेत्याचं ‘रितेश विलासराव देशमुख’ असं पूर्ण नाव पडद्यावर येतं. रितेशने यामागील कारण लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तो म्हणाला, “माझा पहिला मराठी चित्रपट ‘लय भारी’ प्रदर्शित झाला, तेव्हा माझे वडील नव्हते. तेव्हा मला त्यांची खूप आठवण येत होती. ते माझ्याबरोबर कसे असतील, हा विचार मी करत होतो. त्यामुळे हिंदी चित्रपटात माझं नाव फक्त रितेश देशमुख एवढंच दिसतं. पण, मराठी चित्रपटात मी ‘रितेश विलासराव देशमुख’ असं पूर्ण नाव लावतो. कारण मराठीमध्ये मला पुढे जाताना त्यांच्याबरोबर जायचं आहे”.

हेही वाचा>>रितेश देशमुख आईला जिनिलीयाची मास्तरीणबाई का म्हणाला? पाहा व्हिडीओ

हेही पाहा>> Rishabh Pant Accident: उर्वशी रौतेलाने पांढऱ्या ड्रेसमधील फोटो केला शेअर; नेटकरी म्हणतात “त्याचा अपघात…”

रितेश व जिनिलीयाने ‘वेड’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आज(३० डिसेंबर) रोजी त्यांचा हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अशोक सराफ, शुभांकर तावडे हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.