रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. याचबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी करत अनेक रेकॉर्ड्स देखील मोडले. आज २४ ते २५ दिवसांनंतरही अनेक ठिकाणी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल सुरू आहेत.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाने आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवत, फक्त भारतात १०० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. तर, सिनेमाचं जगभरातील कलेक्शन १२० कोटींच्या पुढे गेलं आहे. अशी कामगिरी करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. या सिनेमाची फक्त भारतातील कमाई १०१.४० कोटींच्या घरात पोहोचली आहे.
बॉक्स ऑफिस कलेक्शन ( फक्त भारतात )
- पहिला आठवडा : ₹५७.७० कोटी
- दुसरा आठवडा : ₹२७.०० कोटी
- तिसरा आठवडा : ₹८.४० कोटी
तिसरा आठवडा + चौथा आठवडा :
- १८ वा दिवस (सोमवार): ₹१.२५ कोटी
- १९ वा दिवस (मंगळवार): ₹१.४५ कोटी
- २० वा दिवस (बुधवार): ₹१.२० कोटी
- २१ वा दिवस (गुरुवार): ₹०.९५ कोटी
- २२ वा दिवस (शुक्रवार): ₹०.७० कोटी
- २३ वा दिवस (शनिवार): ₹१.३५ कोटी
- २४ वा दिवस (रविवार): ₹१.४० कोटी
फक्त भारतातील एकूण कमाई: ₹१०१.४० कोटी
‘राजा शिवाजी’ सिनेमाने केले ‘हे’ रेकॉर्ड्स :
- मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग डे
- मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग वीकेंड
- मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक एका दिवसाची कमाई
- मराठी चित्रपटासाठी पहिल्या आठवड्यातील सर्वाधिक कमाई
याशिवाय ‘राजा शिवाजी’ सिनेमाला ‘बुक माय शो’ आणि ‘IMDb’ वर सुद्धा खूप चांगलं रेटिंग मिळालं आहे. या सिनेमाचं ‘IMDb’ रेटिंग दहापैकी तब्बल ८.३ एवढं आहे. ही पोस्ट ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे.

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं असून, याची निर्मिती जिनिलीया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशच्या दोन्ही मुलांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. रियान आणि राहील या दोघांनीही सिनेमात बाळ शिवरायांची भूमिका साकारली आहे.
