Riteish Deshmukh at Shivneri: रितेश देशमुख हा बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने बॉलीवूडमध्ये विविध चित्रपटांत भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याबरोबरच वेड, लय भारी या मराठी चित्रपटांतूनदेखील त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
अभिनेता सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. विविध फोटो, व्हिडीओ तो शेअर करतात. पत्नी जिनिलीयाबरोबरच्या त्याच्या विनोदी रील्सना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.
याबरोबरच तो या माध्यमातून त्याचे चित्रपट, आगामी प्रोजेक्ट यांबद्दल व्यक्त होत असल्याचे दिसते. आता नुकतीच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर गेल्याचे पाहायला मिळत आहे.
रितेश देशमुखने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिवनेरी किल्ला सुंदररीत्या सजवल्याचे दिसत आहे. रितेश छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत असल्याचे दिसत आहे. तसेच तो किल्ल्यावर आलेल्या इतर नागरिकांशी बोलत असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.
“माझा राजा, माझा अभिमान…”
हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले, “शिवनेरीच्या मातीचा आशीर्वाद आणि लाखो शिवभक्तांच्या प्रेमाच्या जोरावर एक नवीन प्रवास सुरू करतोय. अशा साहसी आणि महान राजाला माझा मानाचा मुजरा. माझा राजा, माझा अभिमान”, असे म्हणत भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. “मराठी जपणारा,मराठी समजून घेणारा खरा महाराष्ट्रातला माणूस म्हणजे रितेशसर. जय शिवराय”, “जय भवानी जय शिवराय”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.


रितेश देशमुख लवकरच राजा शिवाजी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलीवूडचे अनेक कलाकार दिसणार आहेत. तसेच हा चित्रपट सहा भाषांत प्रदर्शित होणार आहे. १ मे २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सध्या रितेश देशमुख बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे मनोरंजन करत आहे. या पर्वातील त्याच्या सूत्रसंचालनाचे प्रेक्षक वेळोवेळी कौतुक करतात. रितेश दर आठवड्याला भाऊच्या धक्क्यावर जे स्पर्धक बरोबर असतील, त्यांचे कौतुक करतो, त्यांना प्रोत्साहन देतो. तर जे चुकतात, इतरांचा अपमान करतात, त्यांची तो शाळा घेतो. तसेच, स्पर्धकांना काही टास्कदेखील दिले जातात, त्यावेळी तो त्यांच्याबरोबर मजादेखील करत असल्याचे दिसते. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या सहावा पर्वाचा सूत्रसंचालक म्हणून त्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळत असल्याचे दिसत आहे.

