scorecardresearch

Video: नवरा असावा तर असा! रितेश देशमुखने जिनिलीयासाठी घेतला खास उखाणा

जिनिलीयासाठी रितेश देशमुखने घेतला खास उखाणा, व्हिडीओ व्हायरल

Video: नवरा असावा तर असा! रितेश देशमुखने जिनिलीयासाठी घेतला खास उखाणा
रितेशने जिनिलीयासाठी घेतला भन्नाट उखाणा. (फोटो: फिल्मवाला/ इन्स्टाग्राम)

रितेश देशमुख व जिनिलीया कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. ‘वेड’ चित्रपटातून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या रितेश-जिनिलीयाच्या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

रितेश व जिनिलीया ‘वेड’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. रितेश-जिनिलीयाने मुलाखतीदरम्यान अनेक किस्से शेअर केले आहेत. त्यांच्या मुलाखतीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अशाच एका मुलाखतीदरम्यान रितेशने जिनिलीयासाठी खास उखाणा घेतला. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.

हेही वाचा>> आर्यन खान करतोय नोरा फतेहीला डेट? दुबईतील व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

हेही वाचा>> …म्हणून ‘शार्क टँक’ फेम अश्नीर ग्रोवरने जाहिरातीसाठी विराट-अनुष्का दिला नकार

मुलाखतीत आग्रह केल्यानंतर रितेशने टिपिकल मराठी उखाणा घेतला. “भाजीत भाजी मेथीची, जिनिलीया माझ्या प्रितीची”, असा खास उखाणा रितेशने जिनिलीयासाठी घेतला आहे. त्याच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>>लग्नाला महिना होताच हार्दिक-अक्षया पोहोचले गोव्याला, समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर करत म्हणाले…

रितेश-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट प्रदर्शनाच्या दिवसापासूनच कोटींची कमाई करत आहे. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं असून चाहते चित्रपटगृहांत गर्दी करत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 17:58 IST

संबंधित बातम्या