अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या ‘वेड’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याने त्याच्या ‘वे’ड या पहिल्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अनपेक्षित यशाबद्दल भाष्य केलंय. त्याने चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच चित्रपटाच्या निर्मितीबद्दलही त्याने वक्तव्य केलं. ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Pathaan Box Office Collection: ‘पठाण’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा खरा आकडा समोर; पहिल्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत, चित्रपट बनवत असताना ठेवताना त्याला आणि त्याची पत्नी, सह-कलाकार जिनिलीया देशमुख यांना आलेल्या अनेक अडचणींबद्दलही रितेशने भाष्य केलं. जेव्हा कोणत्याच स्टुडिओने त्यांच्याबरोबर चित्रपटात भागीदारी करण्यास होकार दिला नाही, तेव्हा त्यांना स्वबळावर चित्रपट प्रदर्शित करावा लागला, याबद्दलही रितेशने सांगितलं. त्यासाठी प्रचारात्मक रणनीती तयार करण्याची जबाबदारी जिनिलीयाने घेतली होती.

पाकिस्तानी अभिनेत्रींनाही ‘पठाण’ची भुरळ; एकीने शेअर केला शाहरुखबरोबरचा फोटो, तर दुसरी म्हणते, “हा चित्रपट…”

रितेश म्हणाला, “या आकड्यांची आम्ही कल्पनाच केली नव्हती. सैराट हा एकमेव मराठी चित्रपट होता, ज्याने ५० कोटींहून अधिक कमाई केली होती. आम्ही त्या झोनमध्ये येऊ असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. जेव्हा तुम्ही मोठ्या स्टार-कास्टसह हिंदी चित्रपट बनवता, तेव्हा तुमची रिकव्हरी कुठे आहे, हे तुम्हाला आधीच माहित असतं. पण मराठी चित्रपटांच्या बाबतीत याचा अंदाज बांधणंही खूप कठीण आहे. जेव्हा आम्ही चित्रपट बनवायला सुरुवात केली, तेव्हा आमच्याकडे बोर्डवर स्टुडिओ नव्हता. पण, आम्हाला आशा होती की आम्ही एका विशिष्ट स्केलचा, विशिष्ट व्हिज्युअल अपीलचा चित्रपट बनवत असल्यामुळे तो प्रेक्षकांना आकर्षित करेल. कारण त्यात अजय-अतुलचे उत्तम संगीत, तरुणांना व कौटुंबिक प्रेक्षकांना आकर्षित करू शकेल अशी संवेदनशीलता आहे, याची आम्हाला खात्री होती. खरं तर या चित्रपटातील एक गाणं केल्याबद्दल मी सलमान खानचा खूप आभारी आहे. त्याने आमच्या चित्रपटात खूप मोलाची भर घातली. या सर्व गोष्टी असूनही आम्हाला बोर्डवर स्टुडिओ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला,” असं रितेशने सांगितलं.

भारतीय-पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम; दोन्ही देशांत केली पाच लग्नं, पण दुर्दैवी अखेरानंतर वर्गणीच्या पैशांतून प्रसिद्ध अभिनेत्रीवर झालेले अंत्यसंस्कार

तो पुढे म्हणाला, “स्टुडिओ न मिळाल्याने आमच्यावर दबाव आला. त्यामुळे आम्हाला चित्रपट स्वबळावर प्रदर्शित करावा लागला. परिणामी, सर्व काही बॉक्स ऑफिसवर अवलंबून होते. जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नसता, तर जिनिलीया आणि माझ्यासाठी केवळ आर्थिकच नाही तर मोठा धक्का असता. पण, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली,” असं रितेशने सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh talks about ved box office success thanks to salman khan and audience hrc
First published on: 26-01-2023 at 16:33 IST