scorecardresearch

Premium

“हे माझं स्वप्न नव्हतं, पण…”, ऋतुजा बागवेने सांगितलं नवीन घर खरेदी करण्याचं कारण, म्हणाली…

अभिनेत्री ऋतुजा बागवेने का घेतलं नवीन घर? कारण सांगत म्हणाली…

rutuja bagwe reveals reason behind buying new home
ऋतुजा बागवेचं नवीन घर ( फोटो : इन्स्टाग्राम )

ऋतुजा बागवे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या स्वप्नातलं आणि हक्काचं पहिलं घर ठाण्यात खरेदी केलं. ऋतुजाने तिच्या नव्या घराचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या नव्या घरातील गृहप्रवेश पूजन सोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ऋतुजाचे आई-वडील परळ येथे राहतात. असं असताना अभिनेत्रीने ठाण्यात घर घेण्याचा निर्णय का घेतला? याविषयी तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

हेही वाचा : “द्वेष करणार्‍यांची बोलती…”, किरण मानेंची ‘बिग बॉस’च्या आठवणीत भावुक पोस्ट, म्हणाले, “खोट्या आरोपांच्या जखमा…”

imran khan
‘”तू पुरुष नाही तर…”; अभिनेता इमरान खानने सांगितला बॉडी शेमिंगचा धक्कादायक अनुभव, म्हणाला…
maharashtrachi hasyajatra fame nikhil bane and gaurav more
“अजिबात टेन्शन नको घेऊस”, ‘हास्यजत्रा’ फेम निखिल बनेला ‘बॉईज ४’च्या सेटवर गौरव मोरेनं केली ‘अशी’ मदत
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
marathi actor Swapnil Joshi
“…अशी बायको सगळ्यांना मिळो” अभिनेता स्वप्नील जोशीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

अभिनेत्री ऋतुजा बागवे इट्स मज्जाशी संवाद साधताना म्हणाली, “नवीन घर घ्यायचं असं माझं स्वप्न नव्हतं. पण, माझी आई नेहमी सांगते की, प्रत्येक मुलीने स्वतंत्र असायला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या, मानसिकरित्या अगदी सगळ्या दृष्टीकोनातून मुलीने स्वतंत्र राहावं. कधीच कोणावर अवलंबून राहायचं नाही. तुझं स्वत:चं घर घे…असं माझी आई मला फार पूर्वीपासून सांगते.”

हेही वाचा : “२००७ पासून…”, मुंबईतील ‘या’ कॉलेजमध्ये अभिनेत्रींनी घेतलंय एकत्र शिक्षण, हास्यजत्रेच्या सेटवरील ‘तो’ फोटो चर्चेत

ऋतुजा पुढे म्हणाली, “मला लहानपणापासून पैशांची बचत करण्याची सवय आहे. जेव्हा आपल्याला १० रुपये मिळतात तेव्हा ५ रुपये साठवायचे ही सवय मला आतापर्यंत आहे. हळुहळू पैशांची बचत करण्याचा आकडा वाढू लागला आणि एक असा क्षण आला तेव्हा मला वाटू लागलं की, आता घर घ्यायला हरकत नाही. माझे आई-बाबा माझ्या कायम पाठिशी होते त्यामुळेच एवढी मोठी उडी घेतली.”

हेही वाचा : परिणीती-राघवच्या लग्नसोहळ्यात पाहुण्यांना दिला होता खास रुमाल, सानिया मिर्झाने शेअर केलेला Inside फोटो पाहिलात का?

“माझ्या आईचं नेहमी म्हणणं असतं की, मुलीच्या आयुष्यात वेगवेगळं परिवर्तन झालं पाहिजे. मी लग्न करत नव्हते त्यामुळे तुझं स्वत:चं घर घेण्याची हीच योग्य वेळ आहे असं मला माझ्या आईने सांगितलं आणि मी नव्या घरासाठी शोधाशोध सुरु केली” असं ऋतुजाने सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rutuja bagwe reveals reason behind buying new home in thane sva 00

First published on: 01-10-2023 at 15:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×