दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. सचिन व सुप्रिया यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. 'नवरी मिळे नवऱ्याला', 'नवरा माझा नवसाचा', 'माझा पती करोडपती', 'आम्ही सातपुते', 'आयत्या घरात घरोबा' अशा अनेक हिट चित्रपटांत सचिन-सुप्रिया यांची जोडी झळकली. 'अशी ही बनवाबनवी' हा सचिन-सुप्रिया यांच्या गाजलेल्या चित्रपटापैकी एक आहे. १९८८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. या चित्रपटातील गाणी आजही चाहत्यांच्या ओठावर असतात. 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील 'हृदयी वसंत फुलताना' हे गाणंही अनेक कार्यक्रमांमध्ये वाजवलं जातं. झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यात याच गाण्यावर सचिन व सुप्रिया यांनी रोमँटिक डान्स केला. हेही वाचा>> “भारतातल्या मुली आळशी आहेत” सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ विधानावर उर्वशी रौतेलाचं भाष्य, म्हणाली “ज्या मुली…” हेही वाचा>> Video: हाताने डोसा खाल्ल्याने शिव ठाकरेवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले “तू एकदम…” झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यात 'हृदयी वसंत फुलताना' गाण्यावर सचिन व सुप्रिया पुन्हा एकदा थिरकताना दिसले. अवॉर्ड सोहळ्यातील त्यांच्या रोमँटिक डान्सचा व्हिडीओ झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सचिन व सुप्रिया यांचा रोमँटिक डान्स पाहून चाहत्यांनी या व्हि़डीओवर कमेंट केल्या आहेत.