अभिनेते महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या अभिनयाने एक काळ गाजावला. या दोघांनी चित्रपटांमध्ये एकत्र कामही केले आहे. ८०-९० च्या दशकातले त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने बघतात. पण त्याकाळी महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर यांच्यात स्पर्धा होती असं बोललं जायचं. पण आता सचिन पिळगांवकर यांनीच खरं काय हे सांगितलं आहे.

महेश कोठारे यांच्या ‘डॅम इट आणि बरंच काही’ या पुस्तकाचं काल प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्याला मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्याला सचिन पिळगांवकरही आले होते. तेव्हा त्यांनी महेश कोठारे यांच्याबरोबरच्या अनेक गमतीजमती शेअर केल्या. त्याचबरोबर खरंच त्याकाळी त्या दोघांमध्ये स्पर्धा होती का हेही सांगितलं.

Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024: केकेआरविरुद्ध ८३ धावांची खेळी करूनही विराट कोहली का होतोय ट्रोल? RCBचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात

हेही वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

सचिन पिळगांवकर म्हणाले, “आमच्यात स्पर्धा होती ती फक्त पडद्यावर. पडद्यामागंच प्रेम कुणीही पाहिलं नाही. महेश आणि माझे चित्रपट वेगळे होते. आमच्या जितकी स्पर्धा होती तितकीच आमच्या प्रेक्षकांमध्येही होती. कलक्षेत्रात महेश कोठारेंचं मोठं योगदान आहे.”

आणखी वाचा : महेश कोठारे यांनी मागितली माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

‘डॅम इट आणि बरंच काही’च्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना महेश कोठारे म्हणाले, “माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा दिवस आहे. या पुस्तकाद्वारे मी माझं संपूर्ण जीवन सर्वांसमोर आणलं आहे. यात माझ्या जीवनातील चढ-उतार आणि संघर्ष आहे. हे पुस्तक म्हणजे संपूर्ण जर्नी आहे. कुठल्याही तरुण-तरुणींना कोणत्याही क्षेत्रांत जर यश मिळवायचं असेल, तर त्याला या पुस्तकातून नक्कीच एक प्रेरणा मिळेल.”