Navra Maza Navsacha 2 Teaser : मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा २’. मराठी रसिक प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज (१५ ऑगस्ट) ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे.

२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील गाणी असो, डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यावर मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. त्यामुळेच ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. “‘नवरा माझा नवसाचा २’च्या टीझरने आज नॉनस्टॉप कॉमेडी एक्स्प्रेसच्या प्रवासाला सुरुवात होतेय”, असं कॅप्शन देत लेखक, दिग्दर्शक, निर्माते सचिन पिळगांवकर ( Sachin Pilgaonkar ) यांनी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

suraj chavan bigg boss marathi 5 winner
सूरज चव्हाण झाला अभिनेता! Bigg Boss संपताच पहिल्या चित्रपटाची लॉटरी; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, पाहा ट्रेलर
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
mallika sherawat share harassement experience
“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
Tejaswini Pandit film Yek Number will be screened on october 10
तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ चित्रपटाचे १० ऑक्टोबरला प्रदर्शन
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या

हेही वाचा – Bigg Boss Marathi: निक्की-अरबाजच्या मैत्रीत पडला मिठाचा खडा, ‘या’ व्यक्तीमुळे कडाक्याचं भांडण, नेमकं काय घडलं? पाहा

टीझरच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहायला मिळत आहे. सरकारी तिजोरीतून हिरे घेऊन दोन चोर पळाल्याचं वृत्त समोर आलं आहे. तर दुसऱ्याबाजूला भक्ती व वॅकी आपल्या कुटुंबासह कोकणात प्रवास करताना दिसत आहेत. पण यावेळी बाप्पाची मुर्ती हरवल्यामुळे भक्ती गोंधळ घालताना पाहायला मिळत आहे. या कोकण प्रवासादरम्यान बरीच धमाल होताना दिसत आहे. टीझरचा शेवट बाप्पाच्या जयघोषात होत असून बाप्पाची मुर्ती देखील सापडल्याचं पाहायला मिळत आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात ( Navra Maza Navsacha 2 ) तो हिरे चोरणारा कोण असेल? आणि बाप्पाची हरवलेली मूर्ती कशी सापडते? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

हेही वाचा – Video: “वंदे मातरम…”, अमृता खानविलकरने सुंदर सादरीकरणातून स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात कोणते कलाकार पाहायला मिळणार?

दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ ( Navra Maza Navsacha 2 ) चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर, विजय पाटकर, गणेश पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.