Sachin Pilgaonkar : मराठी सिनेविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणजे सचिन व सुप्रिया पिळगांवकर. या दोघांनी मराठीसह बॉलीवूडदेखील गाजवलं आहे. ‘कुंकू’, ‘एकुलती एक’, ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आम्ही सातपुते’ या चित्रपटांबरोबर सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांच्या जोडीने मराठीतील अनेक चित्रपट गाजवले आहेत. दोघांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. सध्या या जोडप्याच्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. २० सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाच्या यशानंतर सचिन व सुप्रिया पिळगांवकर आपल्या सुट्या एन्जॉय करत आहेत.

सचिन पिळगांवकर पत्नी सुप्रिया पिळगांवकर यांच्यासह भूतान फिरण्यासाठी आले आहेत. येथील सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि गमती-जमतींचे काही व्हिडीओ आणि फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये या जोडप्याने निसर्गरम्य ठिकाणी एक फोटो काढला आहे. त्यानंतर पुढे त्यांनी येथील सुंदर मंदिरे आणि वास्तूचे काही फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत सचिन पिळगांवकर मक्याचे भाजलेले कणीस खाताना दिसत आहेत.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : अनिरुद्धच्या भूमिकेसाठी मिलिंद गवळी ‘असा’ करायचे मेकअप; शेअर केला ‘आई कुठे काय करते’च्या सेटवरचा व्हिडीओ

पुढे त्यांनी भूतानमधील पदार्थांचीदेखील माहिती दिली आहे. सुप्रिया व सचिन पिळगांवकर यांनी भूतानच्या एका हॉटेलमध्ये नाश्ता करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. येथे त्यांनी बटर टी आणि स्वीट राईस मागवलं आहे. पदार्थांचा आस्वाद घेत हॉटेलमध्ये समोर भूतान संस्कृतीमधील एक नृत्य सादर होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच पुढे या जोडप्यानं भूतानमधील बुद्ध पॉइंटलाही भेट दिली आहे. सचिन पिळगांवकर यांनी हे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “भूतानमधून सर्वांना सुंदर सुप्रभात. येथील सर्व व्यक्तींच्या चेहऱ्यावर कायम हसू असते.” त्यांच्या या फोटो आणि व्हिडीओंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता आणि शिवानी सोनार लवकरच अडकणार लग्नबंधनात, बॅचलर पार्टीचे फोटो आले समोर

सचिन पिळगांवकर यांनी पत्नी सुप्रियासह २००४ मध्ये आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातही काम केलं आहे. त्यानंतर तब्बल १९ वर्षांनंतर या जोडीनं पुन्हा एकदा ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये काम केलं. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक होते. चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच सोशल मीडियावर ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील गाणी आणि रील्स व्हिडीओ व्हायरल होण्यास सुरुवात झाली होती. ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट थिएटरमध्ये तब्बल ५० दिवस चालला. ८ ऑक्टोबरपर्यंत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २१.६८ कोटींची कमाई केली आहे.