मराठी मनोरंजनसृष्टीतील क्युट कपलपैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर. हे दोघं नेहमी चर्चेत असतात. दोघांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच मिताली मयेकरने एक व्हिडीओ शेअर केला; जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अभिनेत्री मिताली मयेकरने "चिकन पार्टी" लिहित हा व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये मितालीबरोबर पती सिद्धार्थ चांदेकर, सई ताम्हणकर पाहायला मिळत आहे. मितालीने शेअर केलेला हा मजेशीर व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये एका बाजूला तीन कोंबड्या दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला मिताली, सई, सिद्धार्थ त्या कोंबड्याप्रमाणे डान्स करताना पाहायला मिळत आहे. या तिघांचा मजेशीर व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. हेही वाचा - Premachi Goshta: “नौका घेऊन निघालो दर्याकाठी…”, मुक्ता-सागरने एकमेकांसाठी घेतले भन्नाट उखाणे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने या व्हिडीओवर लिहिलं आहे, "वेडे आहात तुम्ही", तर क्रांती रेडकरने लिहिलं आहे, "हाहाहाहाहा अशक्य…" तसेच प्रिया बापटेने लिहिलं आहे, "हाहाहाहा काय चालंय हे." याशिवाय नम्रता संभेराव, अमृता खानविलकर, अजिंक्य राऊत, सुव्रत जोशी, मिथिला पालकर, दिप्ती लेले अशा अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हेही वाचा - Premachi Goshta: लग्नातील राज हंचनाळेचा कोळी लूक पाहून तेजश्री प्रधानची प्रतिक्रिया, म्हणाली, “तू कसला…” मिताली, सिद्धार्थ आणि सईच्या या व्हिडीओला आतापर्यंत ९४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच काही तासांतच या व्हिडीओला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.