scorecardresearch

Premium

“माझ्या वाढदिवसाला येशील का?”, चाहत्याला उत्तर देत सई ताम्हणकरने ठेवल्या ‘या’ अटी; म्हणाली, “वरण-भात…”

चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर सई ताम्हणकरने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली…

sai tamhankar replied to her fan question
चाहत्याला सई ताम्हणकरने दिलं भन्नाट उत्तर

सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने मराठीसह बॉलीवूडमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘तू हि रे’ या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये सईने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलीवूडच्या ‘मिमि’ चित्रपटात तिने अभिनेत्री क्रिती सेनॉनबरोबर काम केलं होतं. सध्या सईने तिच्या चाहत्याला दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : Video : “पिंगा गं पोरी…”, मंगळागौरीत अक्षयाबरोबर हार्दिक खेळला झिम्मा; व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Narkar avinash narkar
अविनाश नारकरांना नेटकरी म्हणाला ‘आजोबा’, ऐश्वर्या नारकरांनी दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…
Avdhoot
‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये स्पृहा जोशीच्या ऐवजी दिसणार रसिका सुनील, प्रतिक्रिया देत निर्माता अवधूत गुप्ते म्हणाला, “मी तिला…”
why nana patekar gets angry
नाना पाटेकरांनी सांगितलं राग येण्यामागचं कारण; म्हणाले, “तुमची पात्रता…”
prarthana-behere
“माझी जाडी बघून लोक…” वाढलेल्या वजनावर प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच बोलली, म्हणाली…

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा ती इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेते आणि चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अगदी बिनधास्त उत्तर देते. काही चाहते सईला टॅग करून सुद्धा प्रश्न विचारतात. अशाच एका चाहत्याने तिला, “माझ्या वाढदिवसाला येशील का प्लीज?”असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्रीने भन्नाट उत्तर देत काही अटी ठेवल्या आहेत.

हेही वाचा : “बहीण सासरी गेल्यानंतर…”, ‘बिग बॉस’ फेम अक्षय केळकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला “थयथयाट घालणारी…”

सई चाहत्याला उत्तर देत म्हणाली, “बटाट्याच्या काचऱ्या, वरण भात आणि कुरडई प्लेट ठेवा आलेच!!!!” अभिनेत्रीला वरण-भात, काचऱ्या असं पारंपरिक जेवण फार आवडतं असल्याने तिने असं उत्तर तिच्या चाहत्याला दिलं आहे.

हेही वाचा : “१३ वर्षांपूर्वी मी ‘मन्नत’बाहेर…” शाहरुख खानबद्दलची ‘ती’ आठवण शेअर करताना अ‍ॅटली झाला भावूक

दरम्यान, सई ताम्हणकर सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. विविध चित्रपट आणि वेबसीरिजद्वारे ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sai tamhankar replied to her fan question in instagram ask me session sva 00

First published on: 31-08-2023 at 15:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×